एसबीआयने केवायसी फसवणूकीसंदर्भात ग्राहकांना दिला इशारा!

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (SBI)वेळोवेळी आपल्या ग्राहकांना बँकिंग घोटाळ्याला बळी पडू नये यासाठी सूचना देत असते. बँक ट्विटच्या माध्यमातून ग्राहकांना बँकिंग घोटाळ्यासंबंधी जागरूक करत असते. यासंदर्भात एसबीआयने एक ट्विट करून ग्राहकांना केवायसी फसवणूक टाळण्यासाठी सूचना दिल्या आहेत. देशभरात केवायसी फसवणुकीची(KYC fraud) अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत बँक ग्राहकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. अलिकडेच एसबीआयने ट्विटद्वारे एक इशारा जारी केला आहे, त्यात असे म्हटले आहे की केवायसी पडताळणीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यात आली आहे.

बँकेने सांगितले की, केवायसी फसवणुकीची अनेक प्रकरणे देशभरात समोर येत आहेत. या प्रकरणांमध्ये फसवणूक करणारे, ग्राहकांची वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी बँक किंवा कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून एक मजकूर संदेश पाठवतात. बँकेने ग्राहकांना ऑनलाइन फसवणूकीच्या अशा सर्व प्रकरणांचा अहवाल https://www.cybercrime.gov.in/ या संकेत स्थळावर पाठविण्यास सांगितला आहे.

घरगुती गॅसच्या नवीन किंमती 1 ऑक्टोबरला होणार निश्चित, 60 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता : ओएनजीसी – 

केवायसी फसवणूकीच्या वाढत्या घटनांदरम्यान भारतीय स्टेट बँकेने तीन सुरक्षा उपाय सामायिक केले आहेत, ज्याद्वारे ग्राहक त्यांची खाती सुरक्षित ठेवू शकतात. हे उपाय खालीलप्रमाणे आहेतः
१ कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी विचार करा.

२ तुमचा मोबाईल नंतर आणि गोपनीय माहिती कोणाबरोबरही सामायिक करू नका.
३ बँक कधीही केवायसी अद्यतनित करण्यासाठी कोणतीही लिंक पाठवत नाही.
SBI warns customers about KYC fraud, gives tips to avoid it.


आशियातील पाच तेल खरेदीदारांना सौदी अरेबिया ऑगस्ट करारातील संपूर्ण माल पाठवेल! –

आशियातील पाच तेल खरेदीदारांना सौदी अरेबिया ऑगस्ट करारातील संपूर्ण माल पाठवेल!

भारताची ग्राहक डिजिटल अर्थव्यवस्था २०३०पर्यंत ८०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज –

भारताची ग्राहक डिजिटल अर्थव्यवस्था २०३०पर्यंत ८०० अब्ज डॉलर होणार असून किराणा व्यवसाय १,५०० अब्जापर्यंत पोहोचण्याचा अंदाज : अहवाल

Social Media