एसबीआयची ग्राहकांना पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक करण्याची सूचना जारी!

नवी दिल्ली : SBI PAN-Aadhaar Link: एसबीआय (SBI) च्या ग्राहकांसाठी एक आवश्यक सूचना जारी करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी बॅंक भारतीय स्टेट बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना सांगितले आहे की, त्यांनी त्यांचा पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करावा, जेणेकरून भविष्यात त्यांची गैरसोय होणार नाही. तथापि पॅनकार्ड आणि आधारकार्ड (PAN-Aadhaar) सर्व लोकांना लिंक करायचा आहे. परंतु एसबीआयने विशेषतः आपल्या ग्राहकांसाठी सूचना जारी केली आहे, जेणेकरून हे काम त्वरित केले जाईल.

एसबीआयची ग्राहकांना सूचना- 30 जूनपर्यंत आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक न केल्यास ट्रान्झॅक्शनमध्ये येणार अडथळा…..

SBI’s instructions to customers- If Aadhaar card-PAN card is not linked by June 30, transactions will be hampered.

काही दिवसांपूर्वी एसबीआय ने याबाबतची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलद्वारे दिली होती. या ट्विटमध्ये एसबीआय ने म्हटले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देत आहोत की, त्यांनी भविष्यात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आपला पॅनकार्ड आणि आधारकार्ड (PAN-Aadhaar) लिंक करावा जेणेकरून ते कोणत्याही व्यत्ययाशिवाय बँकिंग सेवांचा आनंद घेऊ शकतील. ट्विट मध्ये असेही म्हटले आहे की, पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. जर हे लिंक नसतील तर पॅनकार्ड निष्क्रिय केले जाईल आणि ते कोणत्याही प्रकारचा व्यवहार (ट्रान्झॅक्शन) करण्यास सक्षम राहणार नाहीत.

आयकर विभागाद्वारे (Income Tax Department) जारी केलेल्या आदेशानुसार, पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२१ आहे. जर तुम्ही निश्चित केलेल्या तारखेपर्यंत लिंक केले नाही तर सरकारने आयकर कायद्यात एक नवीन कलम २३४एच जोडला आहे, त्याअंतर्गत तुम्हाला जास्तीत जास्त 1000 हजार रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो.
The country’s largest bank State Bank of India has asked all its customers to link their PAN-Aadhaar, so that they can avoid any inconvenience in future.


कोरोना संकटामुळे कर्ज वितरणावर मंदी : आरबीआय –

कोरोना संकटामुळे कर्ज वितरणावर मंदी, तर ठेवींमध्ये तेजी : आरबीआय

Social Media