सेबीने स्टॉक एक्सचेंजेस, डिपॉझिटरीजना ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यास सांगितले

नवी दिल्ली : भांडवली बाजार नियामक सेबीने (SEBI))सोमवारी स्टॉक एक्स्चेंज(stock exchange) आणि डिपॉझिटरीजना सहा महिन्यांत त्यांची स्वतःची तक्रार निवारण प्रणाली सुरू करण्यास सांगितले. यामुळे गुंतवणुकदारांना तक्रारी नोंदवण्यास आणि त्यांचा निपटारा करण्यात मदत होईल.

हे पाऊल SEBI तक्रार निवारण प्रणाली (SCORES) च्या अनुषंगाने आहे, एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म जून 2011 मध्ये सूचीबद्ध कंपन्या आणि SEBI नोंदणीकृत गुंतवणूकदारांच्या मध्यस्थांविरुद्धच्या सिक्युरिटीज मार्केट संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी सुरू करण्यात आले होते.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने एका परिपत्रकात म्हटले आहे की, “कमोडिटी फ्युचर्स मार्केट/डिपॉझिटरीजसह सर्व मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजना त्यांची स्वतःची ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली स्थापित करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे गुंतवणूकदारांना तक्रारी नोंदवण्यास मदत होईल. तसेच, योग्य नियमांवर आधारित तक्रार निवारण समिती (GRC), लवाद, अपीलीय न्यायाधिकरण इत्यादींमार्फत तक्रार घेण्याची आणि निकाली काढण्याची सुविधा असेल.

सेबीने सांगितले की सेटलमेंट यंत्रणा सहा महिन्यांत कार्यान्वित केली जाईल. गुंतवणूकदारांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने करणे हा या नव्या प्रणालीचा उद्देश आहे.


Rules for Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे नियम, तुमच्या गुंतवणुकीवर परिणाम?

रुपया डॉलरच्या तुलनेत 78.59 या विक्रमी नीचांकी पातळीवर

Social Media