नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेविषयी पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या छवीमुळे देशाच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विदेशी खरेदीदार भारतीय निर्यातदारांकडे ऑर्डर देण्याआधीच वेळेवर वितरण करण्याचे आश्वासन घेत आहेत. त्यांना भीती आहे की भारतातील उत्पादक वेळेवर पुरवठा करू शकणार नाहीत. या परिस्थितीचा फायदा चीनला मिळत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भातील अफवांमुळे देशाच्या निर्यातीवर प्रभाव!
Rumors of second wave of corona affect country’s exports!
चीनला अमेरिकेकडून मिळणाऱ्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. अपैरल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल (एईपीसी) नॉर्दर्न रीजनचे अध्यक्ष ललित ठुकराल यांनी सांगितले की, कपड्यांच्या विदेशी खरेदीदारांनी त्यांना वितरणाबाबत प्रश्न विचारण्यास सुरवात केली आहे. इतर देशांच्या खरेदीदारांना असे वाटत आहे की भारतातील कोरोना प्रसारामुळे येथील निर्यातदारांना वेळेवर काम पूर्ण करता येणार नाही. सध्या निर्यातीमध्ये कोणतीच कमतरता नाही, परंतु ज्याप्रकारे विदेशी खरेदीदारांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे, त्यामुळे त्याचा पुढील निर्यातीवर प्रभाव पडू शकतो. अलिकडेच चीनने कोरोना संसर्गासंदर्भात भारतातील सागरी उत्पादन जसे की मासे इत्यादींच्या निर्यातीवर प्रश्न उपस्थित केला आहे. याचे देखील दुष्परिणाम दिसू शकतात. निर्यातधारकांनी सांगितले की विदेशात भारतातील कोरोना संसर्गाबाबत चुकीची माहिती पसरविली जात आहे, तथापि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान कोणत्याही राज्यात निर्यातीशी संबंधीत उत्पादनाला प्रभावित होऊ दिलेले नाही. पुरवठा साखळी देखील स्थिर आहे.
विदेश व्यापार तज्ञांच्या मते, भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फायदा चीनला झाला आहे. चीनला अमेरिकेकडून मिळणाऱ्या निर्यातीमध्ये गेल्या वर्षीच्या (एप्रिल) तुलनेत यावर्षी (एप्रिल २०२१)मध्ये ३२.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी मार्च मध्ये ३०.६ टक्क्यांची वाढ झाली होती.
The wrong picture being spread about the current wave of corona epidemic in India has raised the possibility of affecting the country’s export orders.
सेन्सेक्सची धमाकेदार सुरुवात ‘या’ शेअर्समध्ये झाली वाढ! –