मुंबई : विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (High Court)दिले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाला (University of Mumbai)मोठा झटका बसला आहे. सिनेटच्या निवडणुका (Senate elections ) शुक्रवारी रात्री अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गट उच्च न्यायालयां गेले होते. त्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे.
मुंबई सिनेटच्या निवडणुका (Senate elections )उद्याच होणार असे आदेश मुंबई उच्च न्यायालयांने(Bombay High Court) दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाने मुंबई विद्यापीठाला फटकारले आहे. त्यामुळे सिनेटच्या निवडणुका उद्याच घ्यावा लागणार आहे. ठाकरे गटाच्या बाजुने न्यायालयांने निकाल दिला आहे. ठाकरे गटाच्या वतीने सिद्धार्थ मेहता(Siddharth Mehta) यांनी बाजु मांडली होती. त्यानंतर आता उद्याच निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित केल्यानंतर ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे आता रविवारी २२ सप्टेंबरलाच मुंबई विद्यापीठाची निवडणूक होणार आहे. मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढत निवडणुका पुढे ढकल्याचा निर्णय़ घेतला होता. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राने एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री याआधी कधीही पाहिलेले नाहीत, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला.
सरकारच्या मनात भीती असल्याने त्यांना विधानसभेच्या आधी कोणतीही निवडणूक घ्यायची नाही. ते डरपोक आहेत. त्यांना निवडणुकीला सामोरे जायचे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजूनही झालेल्या नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीतही ते हरतील, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच ते निवडणुका घेत नाहीत”, असा आरोपही आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी केला आहे.