मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शशिकला जावळकर यांचं निधन झालं आहे. त्या ८८ वर्षांच्या होत्या. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तब्बल दोन दशकं त्यांनी गाजवली आहेत. मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. या अष्टपैलू अभिनेत्रीनं जवळपास 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शशिकला यांच्या निधनामुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री
शशिकला या बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी साकारलेल्या खलनायिका देखील उच्च अभिनित असत. बॉलिवूडमधील अनेक नावाजलेल्या निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केलं आहे. प्रामुख्यानं त्यांचे ‘नौ दो ग्यारह’, ‘कानुन’(Kanun), ‘जंगली’(Junglee), ‘हरियाली और रास्ता’(Hariyali aur Rasta), ‘अनपढ’, ‘यह रास्ते हैं प्यार के’, ‘वक्त’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘नीलकमल’, ‘तीन बहुरानियाँ’, ‘हमजोली’, ‘सरगम’, ‘क्रांती’, ‘रॉकी’, ‘बादशहा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘चोरी चोरी’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. 2005 पर्यंत त्या सिनेसृष्टीत कार्यरत होत्या. परंतु पुढे वाढत्या वयामुळं त्यांनी अभिनयातून निवृत्ती स्विकारली. शशिकला यांच्या निधनामुळं बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. जगभरातील अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Sasikala was known as an all-round actress in Bollywood. The vamps he played were also highly starring. He has worked with many famous bollywood producers and directors. Mainly his films like ‘Nau Do Eleven’, ‘Kanun’, ‘Junglee’, ‘Hariyali aur Rasta’, ‘Unread’, ‘Yeh Rasta Hai Pyaar Ke’, ‘Time’, ‘Devar’, ‘Anupama’, ‘Neelkamal’, ‘Tin Bahuraniyan’, ‘Hamjoli’, ‘Sargam’, ‘Kranti’, ‘Rocky’, ‘Badshah’, ‘Kabhi Khushi Kabhie Gham’, ‘Chori Chori’ were super hits. She was working in cinema till 2005. But later, due to his age, he retired from acting. Sasikala’s death has sent shock waves through Bollywood cinema. Many fans from all over the world have paid tribute to him through social media.