सेन्सेक्स ५२,००० वर बंद तर, निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक!

नवी दिल्ली : आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार साधारण वाढीसह सुरू झाले. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ५३.३४ अंकांच्या वाढीसह सुरू झाला. तसेच, सकाळी ९.१८ वाजता यामध्ये ७३.३८ अंकांची घट नोंदविण्यात आली होती आणि हा ५१,३४९.५० च्या पातळीवर व्यापार करीत होता. तर, निफ्टी १९.१० अंकानी घसरून १५,४१६.५५ पातळीवर होता.

दिवसाच्या व्यापारात निफ्टी (Nifty) बहूतांश १५,५७३.५०वर पोहोचला. सोमवारी दुपारी निफ्टी च्या ५० शेअर्सपैकी सर्वाधिक वाढ रिलायन्स मध्ये ३.३५ टक्के, आयसीआयसीआय बँक मध्ये २.४० टक्के आणि आयटीसी मध्ये १.९५ टक्के दिसून आली. तर, सेन्सेक्स यावेळी ०.९३ टक्के किंवा ४७७.२३ अंकांच्या वाढीसह ५१,९००.११ वर व्यापार करताना दिसून आला.

सेन्सेक्स (Sensex) मध्ये देखील लक्षणीय वाढ

गेल्या व्यापार दिवशी म्हणजेच शुक्रवारी देशांतर्गत शेअर्स बाजारांनी नवीन विक्रम नोंदविले. निफ्टीने (Nifty) विक्रमी उच्चांक गाठला, सेन्सेक्स (Sensex) मध्ये देखील लक्षणीय वाढ दिसून आली. सेन्सेक्स ३०७.६६ अंकांच्या वाढीसह ५१४२२.८८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर, निफ्टी ९७.८० अंकांच्या वाढीसह १५४३५.७० च्या पातळीवर बंद झाला. सुरूवातीच्या व्यापारादरम्यान, आजच्या प्रमुख शेअर्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, एसबीआय, टीसीएस, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, एशियन पॅन्ट्स हिरव्या निशाणीवर उघडले. तर, एल ऍण्ड टी, एक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, मारूती, ओएनजीजी, बजाज फिनसर्व, पॉवर ग्रीडचे शेअर्स लाल निशाणीवर उघडले. मागील व्यापर दिवशी सेन्सेक्स २९१.४४ अंकांच्या वाढीसह ५१४०६.६६ पातळीवर उघडले होते. निफ्टी ९९.१० अंकांच्या वाढीसह १५४३७.०० पातळीवर उघडले होते.

Nifty reaches record high, Sensex close to 52,000, The Bombay Stock Exchange’s major index Sensex opened with a gain of 53.34 points.


कोरोना संकटामुळे कर्ज वितरणावर मंदी : आरबीआय –

कोरोना संकटामुळे कर्ज वितरणावर मंदी, तर ठेवींमध्ये तेजी : आरबीआय

Social Media