दुसर्‍या लाटेमुळे प्रभावित झालेल्या सेवा क्षेत्राला मिळणार 15,000 कोटी रुपयांचे स्वस्त कर्ज!

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पूर्णपणे प्रभावित झालेल्या सेवा क्षेत्रांसाठी स्वतंत्र्य १,५००० कोटी रूपयांच्या कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरबीआयने (भारतीय रिझर्व्ह बॅँक) याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सेवा क्षेत्रातील उद्योजक पुढील आठवड्यात सोमवारी म्हणजेच ७ जूनपासून ते पुढील वर्षातील ३१ मार्चपर्यंत कर्ज घेऊ शकतील. या योजनेअंतर्गत हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटन, ट्रॅव्हल एजंट्स, सहल मार्गदर्शक, विमान सेवा, खासगी बस ऑपरेटर्स, कार दुरूस्ती सेवा, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, स्पा, क्लिनिक, ब्युटी पार्लर आणि सलून या व्यवसायांशी संबंधित उद्योजक कर्ज घेण्यास सक्षम असतील.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील सुमारे २० प्रमुख राज्यांत लॉकडाऊन असल्याने या क्षेत्रातील सर्व कामे जवळपास ठप्प झाली आहेत. आरबीआय च्या या निर्णयामुळे सेवा क्षेत्रातील छोट्या व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय पुन्हा स्थापित करण्यास मदत मिळेल. अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये या महिन्याच्या सुरूवातीपासून ढील देण्यात आली आहे.

गेल्या काही काळापासून कोरोना संसर्गाची गतीही लक्षणीय घटली आहे. अशा परिस्थितीत अशी आशा केली जात आहे की, पुढील महिन्यापासून सर्व राज्यांमध्ये कोरोना संकटाशी संबंधित जवळपास सर्व प्रतिबंध समाप्त होतील. अशावेळी हे कर्ज सेवा क्षेत्रातील व्यवसायिकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकते. अलिकडेच वित्त मंत्रालयाने इमरजन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी योजनेत (ईसीएलजीएस) हॉटेल, पर्यटन, विमान सेवा यांसारख्या सेवा क्षेत्रांना समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसायिकांना कोणत्याही प्रकारच्या हमीशिवाय किंवा तारण न घेता कर्ज दिले जाते.

आरबीआय ने सेवा क्षेत्रावरील दबाव कमी करण्यासाठी तसेच या क्षेत्राशी संबंधित व्यापारी आणि कर्मचार्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची विशेष विंडो तयार करण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गतच बँक सेवा क्षेत्राला कर्ज देऊ शकेल.
आरबीआयने एमएसएमई आणि छोट्या व्यापाऱ्यांना देखील दिलासा दिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरबीआयने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना म्हणजेच एमएसएमई, गैर-एमएसएमई आणि लघु व्यावसायिकांना देखील कर्ज पुनर्रचनेची सुविधा दिली आहे. नव्या घोषणेअंतर्गत 50 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची पुनर्रचना केली जाऊ शकेल.
In the second wave of Corona, a separate loan of Rs 1,500 crore has been arranged for the badly affected service sector. This has been announced by RBI.


एलआयसी आयपीओ (LIC IPO) वर सर्वांचेच लक्ष –

देशातील सर्वात मोठ्या एलआयसी आयपीओ संदर्भात सरकार घेणार ‘हा’ निर्णय!

Social Media