शहापुरात ‘दिवाळी संध्या’ कार्यक्रमाची सुरेल मैफल; ४० गायक कलाकारांनी जिंकली रसिकांची मने

शहापूर दिवाळी संध्या कार्यक्रम : शहापुरातील श्री शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित ‘दिवाळी संध्या’ या संगीतमय कार्यक्रमात ४०

गायक कलाकारांनी आपली गायनकला सादर केली. भाग्यश्री पष्टे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात भक्तिगीते, भावगीते आणि

दिवाळी गीतांनी रसिकांची मने जिंकली.

शहापूर दिवाळी संध्या कार्यक्रम : भक्तिगीते, भावगीते अन् दिवाळी गीतांचा सुरेल नजराणा; शहापुरात रंगली ‘दिवाळी संध्या’

दिव्यांच्या प्रकाशासोबत मंगलमय सुरांच्या लखलखाटाने आसमंत उजळला आणि भक्तिगीते, भावगीते अन् दिवाळी गीतांच्या सुमधुर स्वरांनी

शहापूरकरांची सांज सुरेल झाली. ‘तेजोमय नादब्रह्म हे’, ‘सोनियाच्या ताटी’, ‘आली दिवाळी मंगलदायी’, ‘नवीन आले साल आजला’,

‘हर्षाचा वर्षाचा’ अशा बहारदार गीतांच्या स्वराविष्काराने रसिक मंत्रमुग्ध झाले. श्री शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित ‘दिवाळी संध्या’

या संगीतमय कार्यक्रमात बाल कलाकारांसह तब्बल ४० गायक कलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून दिवाळीच्या आनंदसोहळ्याला

संगीताची अनोखी झालर चढवली.

 श्री शारदा संगीत विद्यालयाचा अनोखा उपक्रम; दिवाळी गीतांनी शहापूरकरांची सांज झाली सुरेल

शहापुरातील संगीत विशारद भाग्यश्री पष्टे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात चिमुकल्या गायकांपासून तरुण, तरुणी आणि महिला

गायक कलाकारांपर्यंत सर्वांनीच आपल्या गायनकलेची सुंदर झलक सादर केली. लक्ष्मीनारायण मंदिरात सांजवेळी पार पडलेल्या या संगीतमय

कार्यक्रमाला रसिकांनी गर्दी केली होती. भाग्यश्री पष्टे यांनी ‘ओंकार अनादी अनंत’ या भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात केली.

त्यानंतर बालकलाकारांनी सादर केलेल्या  ‘शुभंकरोती म्हणा’ या गीताने वातावरणात भक्तिमय प्रसन्नता निर्माण केली. ‘लख लख चंदेरी’

आणि ‘दीपावली मनाई सुहानी’ या गीतांनी दिवाळीचा उत्साह द्विगुणित केला. सार्थक चंदे याने सादर केलेल्या ‘जिवाशिवाची बैलजोड’

या गीतातून परंपरेचे दर्शन घडले. तर अदिती दरेकर, संस्कृती दरेकर, आर्या शिर्के, ओवी निचिते आणि सिद्धी विशे या तरुणींनी गायलेल्या

‘आदिमाया अंबाबाई’ या भक्तिगीताने भक्तिरसाची अनुभूती दिली. कलाश्री भरोदे यांनी ‘लक्षदीप हे’,  ‘आली दिवाळी मंगलदायी’

आणि ‘नवीन आले साल आजला’ या गीतांचे सुमधुर सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. ईशा सोनावळे, आर्या शिर्के, सिद्धी विशे,

श्रिया ढोन्नर मनवा पाचपांडे या तरुणींनी तसेच महिलांनी समूहाने गायलेल्या ‘तबकामध्ये इथे तेवती’ आणि ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’

या गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सोनिया दरेकर, अंजली धसाडे, माधुरी जागरे, योगिता चंदे, प्रमिला बेंडकुळे आणि अदिती काबाडी

यांच्या सुरेल व तालबद्ध सादरीकरणाने मैफलीत विशेष रंग भरला. ‘सोनियाच्या ताटी’ या गीताने भाऊबीजेच्या सणाची भावपूर्ण आठवणही

जागवली. तबला वादक सिद्धेश वाकचौरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाद्यवृंदाची सुरेल साथ देत गीतांच्या सादरीकरणात रंगत आणली.

 

Published by – SanvadMedia

 

शहापूरमधील सांस्कृतिक कार्यक्रम

Social Media