Shaktimaan Movie: भारतीय सुपरहिरो शक्तीमान परत येतोय…

मुंबई : लहान मुलांना आवडणारी छोट्या पडद्यावरील ९० च्या दशकातील शक्तीमान ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. शक्तिमान हे प्रतिष्ठित पात्र आता या  मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. सोनी पिक्चर्सने अलीकडेच ‘शक्तिमान’ या मालिकेवर आधारित चित्रपटाची घोषणा करणारी पोस्ट शेअर केली आहे.

सोनी पिक्चर्सने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या दमदार चित्रपटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शक्तीमानचा चेहरा दिसत नाही. पण पराक्रमी वेषात एक माणूस उभा दिसतो. शक्तीमान मालिकेत अभिनेता मुकेश खन्ना मुख्य भूमिकेत होता पण आता या चित्रपटात ही भूमिका कोण करणार? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony Pictures IN (@sonypicturesin)

शक्तीमान चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर करताना, सोनी टीव्हीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “भारतात आणि जगभरातील अनेक सुपरहिरो चित्रपटांच्या शानदार यशानंतर, आमचे स्थानिक सुपरहिरो तुमच्या भेटीस येणार आहे..” रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट तीन भागात रिलीज होणार आहे.

शक्तीमान मालिका 13 सप्टेंबर 1997 रोजी प्रसारित झाली होती आणि 2005 पर्यंत शक्तीमान ही मालिकेचे प्रसारण होत होते.. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी गंगाधर आणि शक्तीमान या दोन भूमिका केल्या होत्या.

Social Media