राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार
सांगली : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation)केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकमध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. 50 टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे, दुरुस्ती करायला काय हरकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी(Maratha reservation) केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, आरक्षण विधायकमध्ये दुरुस्ती करावी आपण सरकारच्या बाजूने राहू. 50 टक्के आरक्षणावर जाता येत नाही, पण त्याच्यावर जायचं असेल तर संसदेत बदल केला पाहिजे,दुरुस्ती करायला काय हरकत नाही, 50 टक्केच 75 टक्क्यांवर जायला पाहिजे, तमिळनाडूमध्ये 78% वर आरक्षण जातं तर महाराष्ट्रात 75% वर का होऊ शकत नाही. 75 टक्के झाल्यास सगळ्यांनाच आरक्षण मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांनाही मिळेल कोणताही वाद उरणार नाही असे शरद पवार म्हणाले.
मराठी(Marathi) भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून गेली अनेक वर्षे केंद्र सरकारकडे मागणी होती. महाराष्ट्र सरकार, साहित्य क्षेत्रातील संस्था व ज्यांना त्याबद्दल आस्था आहे, असे माझ्यासारखे अनेक सहकाऱ्यांनी ती मागणी केली. केंद्र सरकारला त्यासाठी व्यक्तीगत पातळीवर पत्र लिहून त्याचा आग्रह केला. हा निर्णय जरी उशिरा झाला असला तरी त्याचा आनंद आहे, केंद्र सरकारचे अभिनंदन करू, पण मराठी शाळांची संख्या कमी होतेय आणि मराठी विषय घेणाऱ्यांची संख्याही घटतेय, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.
पुढे शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले, राज्यात मराठी शाळांची संख्या कमी होत आहे व त्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. हे जर असंच सुरू राहिलं तर मराठी भाषेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे, राज्य सरकारला यावर लक्ष द्यावे लागेल व त्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल.
सरकारने लाडकी बहीण योजना काढली त्याचे सर्वांना स्वागत करावे लागले, पण तेवढ्यात भागात नाही. एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका आहे. मुलींवर वाढलेले अत्याचार हे गंभीर आहे. लाडक्या लेकीला अर्थसहाय्य करायचं दुसरीकडे तिच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करायचे सुरू आहे. लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांचे अर्थसहाय्य थांबले आहे. कॅन्सर हॉस्पिटलमधील शासकीय अर्थसहाय्य थांबले आहे. हे वैद्यकीय क्षेत्राचे उदाहरण आहे. अशा अनेक योजनांचे पैसे थांबले आहेत, असे शरद पवार (Sharad Pawar)यांनी म्हटलं आहे.
आज जे महाराष्ट्रात घडत आहे ते अत्यंत चुकीचे आहे. सामाजिक सलोखा राखून सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रात सामाजिक सलोखा राखला पाहिजे. अमित शहा सध्या काहीही बोलत असतात. देशाचा गृहमंत्री भाषण काय करतो? शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा, पक्ष फोडा. ते कायदा व सुव्यवस्था कोठे नेऊन ठेवतात? देशाची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे, ते नेते अशी भाषा करतात. येत्या दीड महिन्यात याबाबत निकाल लावू, असेही शरद पवार म्हणाले.