पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात आणि मेळाव्यात मोठी गर्दी उसळली. यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील स्वतः मंचावर होते.यांच्या समोर पार पडणाऱ्या कार्यक्रमात सर्व नियम आणि आवाहन धाब्यावर बसवले गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.
दरम्यान वकील गुणरतन सदावर्ते यांनी शरद पवार व दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध बेकायदा मंडळी जमा होणे आणि संक्रमणाचे नियम न पाळणे त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल 21 नुसार इतरांच्या जीवन जगण्या बाबत संक्रमणाचा धोका उद्भवतो त्यामुळे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करा अशी तक्रार केली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
कलम 188 269 इंडियन पिनल कोड च्या अंतर्गत गुन्हा नोंद घेण्यात आला परंतु शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांना आरोपी केलं नाही लोकांनी डोळ्यांनी बघितलं आरोपी करणाऱ्या लोकांमध्ये पाच लोक आहेत त्यात ठोंबरे , संजय काळे, संचेती आणि इतर असे आरोपी आहेत.