दबावाचे राजकारण महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. : जयंत पाटील 

मुंबई  : राष्ट्रवादीच्या  प्रमुख नेत्यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे झाली. यामध्ये पक्षांतर्गत निवडणूक, पक्ष संघटना, पक्ष बांधणी यावर सविस्तर चर्चा झाली. शिवाय महाराष्ट्रात पक्ष बुथवर बांधण्यासाठी काही विभागीय नेते नेमण्यात आले असून आदरणीय शरद पवार(Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत एक दिवसीय विभागीय शिबीरे घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पक्षांतर्गत तालुका, जिल्हा स्तरावर एक – दीड महिन्यात निवडणूका पूर्ण केल्या जाणार असल्याचेही जयंत पाटील म्हणाले.  एप्रिल व मे महिन्यात ही शिबीरे घेण्यात येतील. याशिवाय महाविकास आघाडीच्या सभा सुरू आहेत. पहिली सभा संभाजीनगर येथे झाली. पुढची सभा नागपूरला होणार आहे. दरम्यानच्या काळात पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना जबाबदारी देऊन काम करण्याची सुचना करण्यात आली आहे असेही जयंत पाटील(Jayant Patil) यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यांदा विभागीय स्तरावरील शिबीरे होतील. आमचे नेते सर्व जिल्ह्यांचा दोन महिन्यात दौरा करतील. हा पक्षाच्या वाढीसाठी कार्यक्रम आहे. त्याप्रमाणे काम केले जाणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकाराला धमकावण्यात आले. ही माहिती रोशनी शिंदे (Roshni Shinde)यांनी माध्यमांना दिली. त्यामुळे शिंदे या महिलेला त्यामुळे मारहाण झाली,ती महिला गर्भवती आहे. महाराष्ट्रात असा हिंसाचार कधी झाला नाही. या सरकारला विरोधात बोलले पटत नाही. रोशनी शिंदे या महिलेला मारहाण झाली याचा अर्थ विरोधात कुणी बोललेले खपत नाही म्हणून त्यांना मारहाण करणे, हल्ला करणे हे गंभीर प्रकरण महाराष्ट्रात झाले आहे. या घटनेचा निषेध करतानाच मारहाण करणाऱ्या महिलांना तात्काळ अटक करा, पत्रकार आणि रोशनी शिंदे यांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे. कसल्या मानसिकतेचे लोक राज्यात सत्तेत बसले आहेत हे यातून लक्षात येते असा संताप जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची एक दिवसीय विभागीय शिबीरे

वैभव कदम नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. वैभव कदमने आत्महत्या का केली याच्या खोलात जायला हवे. त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून टॉर्चर केले जात होते. जुन्या प्रकरणात दबाव आणला जात होता. दबाव का आणला ? मानसिक छळ का गेला ? कारण जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात बोलल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना अटक करता येईल यासाठी ठाणे पोलीस यामध्ये सहभागी झाले आहेत. या प्रकरणात ठाण्याचे आयुक्त काय करतात?. याचा खुलासा झाला पाहिजे. आम्ही कायदयाने चालतो असे समजतो पण कायद्याला मुरड घालण्याचा प्रकार काही लोकांवर दबाव करुन केला जात असेल तर महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही  असे  आव्हान पाटील यांनी दिले. हलवून दाखवावा, असे थेट आव्हान जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना दिले.हलवून दाखवावा, असे थेट आव्हान जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.असे थेट आव्हान जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.संभाजीनगरची दंगल कुणी केली. दंगली अगोदर स्कुटरवरुन फिरत होते ते कोण आहेत. दंगलीच्यावेळी नेमकी कुणी कुणावर दगडफेक केली याची माहिती पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बघून लवकर पुढे आणावी. त्यावर उत्तर मिळेल जे अनिल बोंडेना अवघड जाईल. त्यामुळे बोंडेंनाच कळेल ही लोक आपल्या ओळखीची आहेत. आणि म्हणून सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसत आहेत त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी व कारवाई करावी अशी विनंती जयंत पाटील यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत पण त्यांना ठाणे शहर व जिल्हा त्यांच्या अधिकारात नाही. ठाण्यातील सध्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहिली तर देवेंद्र फडणवीस यांना आव्हान करतो की त्यांनी आज किंवा उद्यापर्यंत किंवा २४ तासात ठाण्यातील एक तरी पोलीस अधिकारी बदलून राज्यात इतरत्र हलवून दाखवावा, असे थेट आव्हान जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

Social Media