वर्षावर सेना आमदारांना स्नेहभोजन, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

मुंबई  :  शिवसेना आमदारांचे वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन, निधी मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांसमोर सेना आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती

सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे सर्व राज्यातील आमदार हे मुंबईत आहेत, शुक्रवारी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज ज्या आमदारांचा कार्यकाळ संपत आहे, त्याचा सत्कार समारंभ सुधा करण्यात आला. दरम्यान या कालावधीत आपापले पक्ष आमदारांची बैठक घेत कामाचा आढावा घेत आहेत.गेल्या आठवड्यातही सेनेच्या २५ आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

दरम्यान, आज शिवसेनेच्या वतीने वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारसाठी सस्नेह भोजप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी शिवसेना आमदारांनी नाराजी व्यक्त करत आपली खदखद मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली, आपल्या पक्ष्याला निधीत डावलले जात आहे, तसेच महविकास आघाडी सरकारमधे शिवसेनेला निधी कमी दिला जातो. त्यामुळे मतदासंघांतील कामे होत नसल्याची खत यावेळी आमदारांनी बोलून दाखवली, अशी सूत्रांची माहिती आहे. यावर आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Social Media