सोलापूर : श्री. शहाजीराजे भाेसले यांचे ज्येष्ठ सुपुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे थाेरले बंधू श्री. संभाजीराजे ज्यांनी आपले वडील शहाजी राजे यांच्या समवेत आदिलशाहीच्या पदरी होते. येणाऱ्या शत्रूला थाेपविण्यासाठी शहाजी आणि संभाजी राजांना युद्ध करावे लागले, युद्धप्रसंगी अफझलखान देखील उपस्थित हाेता. अफझलखानाने शहाजीराजांवर असणाऱ्या रागापाेटी आणि द्वेषापोटी त्याने या युद्धात संभाजी राजांची कपटाने हत्या (खुन) केली.
कर्नाटक(Karnataka) राज्यातील काेप्पल जिल्ह्यातील कनकगिरी(Kanakagiri) येथे संभाजी राजांची समाधी बांधण्यात आली. पण आज येथील समाधी स्थळाची अवस्था समाज कंटकांकडून बदलण्याचा प्रयत्न चालू आहे. समाजकंटकांनी संभाजी राजांच्या समाधीला पांढरा आणि हिरवा रंग देऊन व हिरव्या कपड्याने समाधी झाकून समाधीला दर्ग्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू आहे . याठिकाणी मी बेंगलाेरचे शामसुंदर गायकवाड,ऍड हुबळीचे काळे, गदगचे जगताप, काेकाटे आणि स्थानिक रहिवासी मंजुनाथ, राघवेंद्र, नागराज व असंख्य शिवप्रेमी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
याठिकाणी स्थानिक हिंदू शिवप्रेमींची भेट घेतली. त्यांनी येथील संभाजी महाराज समाधीचे विद्रुपीकरण कशाप्रकारे चालू आहे याची माहिती दिली. आपल्याला महाराष्ट्रातून काही ठाेस भूमिका घेऊन हे संभाजी महाराज समाधीस्थळ जपलं पाहिजे. जय भवानी!! जय शिवराय!!!!