काबूल, कंदहार, बल्खपर्यंत समशेर गाजवणारे अनेक वीर सेनापती मोगल साम्राज्यात होते. त्यांच्या प्रत्येक सुभ्याच्या ताब्यात लाखो सैनिक, प्रचंड युद्धसामग्री, भव्य तोफखाना आणि अपार खजिना होता.
पण तरीही…
कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांशी थेट युद्ध करण्यास तयार होत नसे!
महाराजांचे पराक्रम, युद्धनीती आणि गनिमी कावा यामुळे मोगल साम्राज्यातही त्यांचे नाव घेताच सेनापती थरथर कापत. त्यांचा धाक एवढा होता की औरंगजेबासारख्या बादशहालाही महाराजांना थेट लढाईत अडकवण्यासाठी डावपेच रचावे लागले!
आणखीन सर्वात महत्वाची आणी आधोरेखीत करण्यासारखी गोष्ट म्हणजे मुघल बादशहा आलमगीर औरंगाजेब देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतरच दख्खनेत अर्थात महाराष्ट्रात उतरला छत्रपती शिवराय जिवंत असेपर्यंत त्याची महाराष्ट्रात एव्हाणा दख्खनेत उतरायची हिम्मत वा टाप नव्हती.
शिवछत्रपतींचा पराक्रम, शौर्य आणि रणनीतीचा प्रभाव साऱ्या हिंदुस्थानभर पसरला होता. आणि म्हणूनच महाराज फक्त एक योद्धा नव्हते, तर एक अजिंक्य स्वराज्यसंस्थापक होते!
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी
जगदीश्वर मंदिराच्या पूर्वदरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच छत्रपती महाराजांची समाधी. सभासद बखर म्हणते, ‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काळ शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाच्या चिर्याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’
आम्हा महाराष्ट्र देशीच्या समस्त मराठीजनांना स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगायला शिकवून आणि लढवय्या बाणा अंगात भिनवून उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात महाराष्ट्राचं सोनं करून महाराजांनी जगाचा निरोप घेतला, जसा हिमालयातील कैलासीचा शिवशंकर तसा आमच्या सह्याद्रीतील रायगडीचा शिवछत्रपती राजा. पुढील हजारो नव्हे तर लाखो वर्षांच्या भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात माझ्या शिवछत्रपतींचे नाव हे चैतन्यरूपी अजरामरच राहणार हे मात्र नक्की…..
” ३ एप्रिल १६८० छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा (राजधानी किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी)”
#छत्रपती_शिवाजी_महाराज
छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य
प्रमोद दादा पाटील