मुंबई : टेलिव्हिजनची सुसंस्कृत आणि सर्वात लाडकी सून ‘प्रीता’ उर्फ श्रद्धा आर्याने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली आहे. 16 नोव्हेंबर रोजी श्रद्धा आर्याने नौदल अधिकाऱ्यासोबत सप्तपदी विधी पूर्ण केला.. श्रद्धाचे लग्न हे एक बिग फॅट इंडियन वेडिंग होते जे पूर्ण विधी आणि थाटामाटात पार पडले. लग्नानंतर श्रद्धाच्या लग्नाचे रिसेप्शनही पार पडले. लग्नाच्या रिसेप्शनमधील श्रद्धाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
श्रद्धा आर्याचे लग्न दिल्लीतील अंदाज हॉटेलमध्ये पार पडले. ज्यामध्ये त्यांचे अनेक मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. श्रद्धा आणि राहुल यांचे लग्न जुळले आहे, जे त्यांच्या कुटुंबाच्या संमतीने केले आहे. तिचे चाहते विशेषत: श्रद्धाच्या लग्नाची वाट पाहत होते. त्याचबरोबर लग्नानंतर त्यांच्या लग्नाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ज्यांना खूप पसंती दिली जात आहे. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी श्रद्धाचे लग्नाचे रिसेप्शन होते ज्यामध्ये श्रद्धा खूपच सुंदर दिसत होती.
View this post on Instagram
श्रद्धाने लग्नात भारी ड्रेस आणि ज्वेलरी कॅरी केली होती. याशिवाय तिने तिच्या लग्नाच्या रिसेप्शनचा लूक अगदी साधा ठेवला होता. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तिने साडी नेसली होती. तेही भारी बनारसी किंवा कांजीवरम नेसलेली नव्हती तर नेट साडी नेसली होती. या सिंपल लूकमध्ये श्रद्धा खूपच सुंदर दिसत होती. या अतिशय सुंदर ग्रे कलरच्या साडीसोबत तिने फुल स्लीव्हजचा ब्लाउज घातला होता. यासोबतच तिच्या हातातील लाल बांगड्याही तिच्या सोंदर्यात भर घालत होत्या. श्रद्धाने कोणताही हेवी मेकअप न करता अगदी सिंपल लूक ठेवला होता. श्रद्धाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला.
View this post on Instagram
श्रद्धाचे चाहतेही तिच्या साधेपणावर भारावून जात आहेत. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती पती राहुल नागलसोबत रोमँटिक पोज देत आहे. श्रध्दा आर्याचे १६ नोव्हेंबरला लग्न झाले. त्यानंतर १७ नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडले. श्रद्धाच्या लग्नात तिचे ऑनस्क्रीन कुटुंबही आले होते. श्रद्धाच्या लग्नात तिची ऑनस्क्रीन आई सुप्रिया शुक्ला, ऑनस्क्रीन बहीण अंजुम फकीह आणि तिच्या जाऊची भूमिका करणारी अभिनेत्री रुहीही आली होती.