महाराष्ट्राची मदर तेरेसा अशी ओळख असणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता.
हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आरंभीस केले.
अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सिंधुताईंची दुसरी ओळख म्हणजे अनाथांची माय… नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव चिंधी असे ठेवले होते.. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी… लहानपणापासूनच बुद्धिमान असल्या तरी परिस्थितीमुळे जेमतेम त्यांना मराठी चौथीपर्यंत शिकता आलं वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने 26 वर्षांनी मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला तेव्हा गुरे वळवणे हा त्यांचा व्यवसाय होता तसेच शेण काढता काढता स्त्रिया अर्धमेल्या होऊन जात… त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही म्हणून माईंनी बंड पुकारला माई हा लढा जिंकल्या… पण त्याची किंमत चुकवावी लागली.. येणारी मिळकत बंद झाली… माईंच्या चारित्र्यावर संशय घेवून यांना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढण्यात आलं. त्यांना गोठ्यात आणून टाकलं त्या अवस्थेत कन्या जन्माला आली.. गावकऱ्यांनीही त्यांना हाकलून दिलं.. माहेरच्यांनीही पाठ फिरवली.. पोट भरण्यासाठी भीक मागण्याची वेळही माईंवर आली होती… त्यामुळे त्यांनी स्वतः आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा केला परंतु या विचारांवर मात करत आपल्या मुलीच्या संगोपनासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागायला सुरुवात केली..अनेक दिवसानंतर त्यांना जाणवलं की आपल्या प्रमाणे असंख्य आहेत.. त्यांनी त्यांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच अनाथांची माय म्हणून प्रवास सुरू झाला.. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यांना पुरस्कारातून जी काही रक्कम मिळली ती रक्कम त्यांनी निस्वार्थी भावनेतून अनाथांना घर बांधून देण्यात तसेच त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात वापरले.. प्रेम आणि दयाळू स्वभावामुळे 200 पेक्षा जास्त जावई 36 मुली आणि हजाराहून अधिक नातवंडांचा वारसा त्यांना आहे.. अनाथांसाठी झटण्यास सिंधुताई सतत प्रयत्नशील होत्या.. अत्यंत आपुलकीने अनाथांचे संगोपन त्या करत असत.. अशी ही माय म्हणजे सिंधुताई सपकाळ यांनी स्मशानात खाल्लेली भाकरी त्या कधी विसरल्या नाही अहमदनगर मधील रेल्वेस्टेशन जवळ मागितलेली भीक त्या विसरल्या नाहीत आणि आपल्या नवर्याने केलेला अत्याचार सुद्धा त्या कधी विसरू शकल्या नाही… त्यांनी त्यांचे अनुभव, समाजाप्रती बांधिलकी कशी जपावी इ. विषयी मार्गदर्शन करून दिले. त्यांच्या संभाषणात इतकी जागरूकता होती की सर्व मंत्रमुग्ध होऊन त्यांना ऐकत होते.
आज त्यांच्या जाण्याने एक थोर समाजसेविका, अनाथांची माय म्हणून एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पुन्हा भरून येणार नाही. अनाथांची माय ज्यांनी आपल्या अनाथ कुटुंबाला आजवर आपल्या परीने प्रयत्न करत अप्रतिम कामगिरी करून मायेचा ओलावा दिला पद्मश्री पुरस्कार कर्त्या शेवटच्या घटकापर्यंत समाज कार्याला वाहून घेणाऱ्या सर्वांची माय माऊली सर्वांना पुन्हा अनाथ करून काळाच्या पडद्या आड अनंतात विलीन झाल्या महाराष्ट्राला पोरका करून गेल्या अश्या माउलीला सतश प्रणाम त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही भावपूर्ण आदरांजली