सूर्यावर सौरवादळामुळे पृथ्वीवरील इंटरनेट, मोबाईल बंद पडण्याची शक्यता…’नासा’सह इस्रोचा इशारा 

मुंबई :  सौर वादळाने(Solar storms) सूर्याच्या पृष्ठभागावर  मोठे स्फोट झाले आहेत. या स्फोटामुळे आलेल्या वादळाला जिओमॅग्नेटिक वादळ(Geomagnetic storm) किंवा स्ट्रोम (G3) म्हणतात. G3 वादळाचा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांवर परिणाम होऊ शकतो.
या वादळाचा परिणाम पृथ्वीवर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अमेरिकेन अंतराळ संस्था नासाने (NASA)अलर्ट दिले आहे. सौर वादळ पृथ्वीवर आदळले तर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे रेडिओ ब्लॅकआउट (Radio blackout)आणि वीज ब्लॅकआउट(Power blackout) होण्याची शक्यता आहे. पृथ्वीवरील मोबाईल, संगणक आणि इंटरनेट सेवा(Internet services) बंद होऊ शकतात. पृथ्वीबरोबर समुद्रात वादळ निर्माण होण्याचा धोका आहे.
सूर्याच्या पृष्ठभागावरून दोन मोठ्या सौर ज्वाला(Solar flare) बाहेर पडल्या आहेत. त्यांना कोरोनल मास इंजेक्शन(Coronal mass injection) म्हटले जाते. ते थेट पृथ्वीच्या दिशेने गेले आहेत. शास्त्रज्ञांनी त्यांना X7 आणि X9 अशी नावे दिली आहेत. X9 फ्लेअर हा गेल्या सात वर्षांतील सूर्यापासून निघणारा सर्वात शक्तिशाली फ्लेअर आहे. भारतीय अंतराळ संस्था (इस्त्रो) सूर्यावर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेऊन असते. त्यासाठी लडाखमध्ये केंद्र बनवले आहे. त्या केंद्रातून सूर्यावर भीषण स्फोट होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे भारतीय उपग्रहांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कारण हे सौर वादळामुळे उपग्रहाला धोका निर्माण होऊ शकते.
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने(NASA) सौर वादळाचा(Solar storms) भारतावर परिणाम होण्याचा ईशारा दिला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सच्या(Indian Institute of Astrophysics) संचालक डॉ. अन्नपूर्णी सुब्रमण्यन(Dr. Annapurna Subramanian) यांनी सांगितले की, कण, ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र आणि पदार्थ यांच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे सूर्यावर स्फोट होणार आहे. या स्फोटानंतर ताशी 250 ते 3000 किलोमीटर वेगाने सौर वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ते पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकते.
Social Media