सोनिया गांधी यांचे पुस्तक : सोनियाजी गांधी यांचे पुस्तक फाडणे हे गद्दारसेनेच्या बौधिक दिवाळखोरीचे लक्षण, ‘सुर्यावर थुंकल्यास थुंकी उलट त्यांच्यावरच पडते’,एकनाथ शिंदेंच्या ‘५० खोके, एकदम OK’च्या विकृतीकडून सभ्यता व संस्कृतीची अपेक्षा ती काय करणार? पुस्तकाची पाने फाडून इतिहास आणि सत्य कधीही पुसले जात नाही,ज्यांना स्वतःचाच इतिहास-भूगोल नाही, त्या शिंदेसेनेने सोनियाजी गांधी यांच्या जीवन प्रवासावर बोलावे हेच हास्यास्पद
मुंबई : काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ हे पुस्तक
एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या गद्दारसेनेने फाडून बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे.
पुस्तक फाडल्याने इतिहास बदलत नाही पण ५० खोके, एकदम ओकेवाल्या गद्दारसेनेकडून सभ्यता व संस्कृतीची
अपेक्षा करणे व्यर्थ आहे. पुस्तक फाडण्याची गद्दारसेनेची कृती सुर्यावर थुंकण्यासारखी आहे, असा हल्लाबोल
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ(Harshvardhan Sapkal) यांनी केला आहे.
सोनिया गांधी यांचे पुस्तक : सोनियाजी गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ पुस्तक फाडणाऱ्या गद्दारसेनेचा काँग्रेसकडून तीव्र निषेध.
सोनियाजी गांधी(Sonia Gandhi) यांचे ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ (Belonging: A Journey of Love)
पुस्तक फाडणाऱ्या गद्दारसेनेचा निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पुस्तक फाडल्याने
सोनियाजी गांधी (Sonia Gandhi)यांचे व्यक्तीमत्व व कर्तृत्व कमी होत, नाही पण यातून एकनाथ शिंदे यांच्या
गद्दारसेनेची विकृती दिसून येते. एकनाथ शिंदे यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. त्यांनी पुस्तक वाचून त्यावर
चर्चा करावी पण ते पुस्तक इंग्रजीत असल्याने त्यांना ते वाचता येत नसावे. एकनाथ शिंदे यांच्यात जर हिम्मत असेल तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेले अनेक निर्णय रद्द केले आहेत, ते जीआर फाडून
दाखवावे. एका महिलेचे पुस्तक गद्दारसेनेने महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फाडले, हा प्रकार केविलवाणा
असून तो मातृत्वाचाही अपमान आहे.
सोनियाजी गांधी(Sonia Gandhi) यांनी भारतीय संस्कृती आत्मसात केली. त्यांच्या सासू इंदिराजी गांधी व पती
राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. सोनीयाजी यांनी पंतप्रधानपद नाकारून त्याग केला, गांधी कुटुंबाने
देशासाठी बलिदान व त्याग केला आहे. सोनियाजी गांधी यांचे पुस्तक फाडणे अशोभनीय आहे. एकनाथ शिंदे
यांच्या गद्दारसेनेने ‘गाय मारली म्हणून आम्ही वासरु मारणार नाही’, त्यांच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करुन
राजकीय विकृत्तीला चोख उत्तर देऊ, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सोनिया गांधी यांचे पुस्तक : पुस्तकाची पाने फाडून सत्य पुसले जात नाही – विजय वडेट्टीवार.
सोनियाजी गांधी यांच्या पुस्तकातील पान नंबर २०१ फाडून ज्यांनी निषेध नोंदवला आहे, त्यांनी आपल्या वैचारिक
दिवाळखोरीचे दर्शन घडवले आहे. ज्या देशात व्यक्तिस्वातंत्र्य आहे, बोलण्याचे आणि लिखाणाचे स्वातंत्र्य आहे,
त्या देशात पुस्तकाच्या प्रती फाडणे म्हणजे निर्बुद्धांची मांदियाळीच आहे. या पुस्तकातील वस्तुस्थिती तुम्हाला
मान्य नसेल, तर लोकशाही मार्गाने विरोध करा. त्याविरोधात पुस्तक लिहा. पुस्तकाच्या प्रती फाडणे ही निर्लज्ज
मस्ती आहे आणि ही नशा उतरायला वेळ लागणार नाही, असे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न- बाळासाहेब थोरात.
सोनियाजी गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रती काही अर्धवट मंडळींनी फाडल्या.एखाद्या पुस्तकातील विचारांशी मतभेद
असू शकतात, ते मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुस्तक वाचावे आणि त्यातील मुद्द्यांवर बोलावे.
पुस्तक फाडून प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न दुर्दैवी आहे. या कृतीत पुढे असलेल्यांपैकी सारेजण सत्तेच्या जवळ
राहण्यासाठी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत. त्यामुळे ज्यांना स्वतःचाच इतिहास-भूगोल नाही, त्यांनी
सोनियाजींच्या जीवन प्रवासावर बोलावे हेच हास्यास्पद आहे, असे CWC सदस्य बाळासाहेब थोरात यांनी
म्हटले आहे.
शिंदेसेनेने सात्यकी सावरकरांना विचारावे- सचिन सावंत.
ज्या पक्षाची विचारधारा खोक्यापासून सुरू होते आणि खोक्यापर्यंत संपते त्यांच्या पुस्तक फाडण्याने काय फरक
पडणार? बरे ज्यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून पत्रकार परिषद घेतली ते दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. स्वतःच्या
विचारांवर यांना ठाम राहता आले नाही. पुस्तक फाडाल पण सत्य कसे फाडाल? सावरकरांबद्दल जे आक्षेपार्ह
विधान या पुस्तकात आहे अशी भूमिका हे अघात ज्ञानी घेत आहेत त्याबाबत सावरकरांच्या नातवाने न्यायालयात
स्वतः स्पष्टता दिली आहे. त्यामुळे आता सात्यकी सावरकरांना त्यांनी विचारावे. यांना ना इतिहासाचा अभ्यास ना विचार.
एकनाथ शिंदे यांनी सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसाला वर्तमान पत्रात स्वतः पहिल्या पानावर दिलेली जाहिरात
विसरले का? असा प्रश्नही काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
Published by – SanvadMedia