आज विशेष अधिवेशन, मनोज जरांगेंच्या नेमक्या मागण्या काय?

मराठा(Maratha) समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज सरकारने विशेष अधिवेशन(Special Session) बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा(Maratha reservation) महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे(Manoj Jarange) यांच्या आंदोलनानंतर सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे.

या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी तीन महत्वाच्या मागण्या सरकारकडे केल्या असून, यातील प्रमुख मागणी म्हणजे सगेसोयरे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यात यावे अशी आहे.

 मनोज जरांगेंच्या प्रमुख मागण्या :

सगेसोयरे कायदा( Relatives Law) : आजच्या विशेष अधिवेशनात सगेसोयरे अध्यादेशाचे रुपांतर कायद्यात करून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी मनोज जरांगे यांची आहे.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत (Cases against Maratha protesters should be withdrawn): राज्यभरात मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारने आंतरवाली सराटीसह राज्यभरात मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange)यांनी केली आहे.

कुणबी नोंदी ग्रामपंचायतवर लावण्याची मागणी( Demand to put kunbi records on gram panchayats) : कोणत्या गावात कुणाची नोंद सापडली याची महिती गावकऱ्यांना आणि संबंधित व्यक्तीला मिळावी यासाठी त्या-त्या गावात सापडलेल्या नोंदी त्या गावाच्या ग्रामपंचायतवर लावण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे.

Social Media