आता थेट तुमच्या गावातून एसटी बस पंढरपूरला जाणार; मात्र ही अट लागू

यंदा आषाढी एकादशीला(Ashadhi Ekadashi) पंढरपूरला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून आनंदाची बातमी दिली आहे. यंदा आषाढी यात्रेनिमित्त भाविकांसाठी एसटीने 5 हजार विशेष गाड्यांचं नियोजन केलं आहे.

यंदा राज्यातील कोणत्याही गावातून 40 किंवा जास्त भाविक असतील तर त्यांनी मागणी केल्यास थेट त्यांच्या गावातून एसटी बस(ST bus) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असं आवाहन एसटी(ST) महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.

या प्रवासात देखील 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी 50 टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

Social Media