मुंबई दि. २४ : राज्य एसटी महामंडळाच्या कर्मचा-यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने ४१टक्के पगारवाढीचा प्रस्ताव कर्मचारी संघटनासमोर ठेवला आहे. या शिवाय दहा तारखेपूर्वी दर महिन्यात पगार देण्याची हमी आणि उद्या आणि परवा असे दोन दिवसांत सकाळी कामावर हजर होणा-या निलंबीत कर्मचा-यांचे निलंबनही मागे घेतले जाणार आहे अशी माहिती परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांनी जाहीर केला आहे. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत तर उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषदेला हजर होते. मात्र याबाबत कर्मचारी संघटनाच्या नेत्याशी बोलून उद्या निर्णय घोषित करणार असल्याची भुमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यानी जाहीर केली आहे.
संपावर अंतरिम मार्ग(Interim route on strike)
परिवहनमंत्री परब म्हणाले की, गेल्या १५ दिवसांपासून संपामुळे ग्रामिण भागात शाळकरी मुलांपासून नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मात्र ज्या मूळ विलीनीकरणाच्या मागणीसाठी हा संप केला जात आहे, त्यामुद्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने त्रिसदस्य समिती नेमून अहवाल १२ आठवड्यात देण्याचा आदेश दिला आहे. हा अहवाल जो काही असेल तो सरकार मान्य करले मात्र तोपर्यत संपावर अंतरिम मार्ग काढला पाहीजे कारण जनतेला त्रास होत असल्याने सरकारची ती जबाबदारी आहे. तो पर्यंत संप चालू ठेवता येणार नाही.
४१ टक्के अंतरीम पगारवाढीचा प्रस्ताव(41 per cent interim salary hike proposed)
परब म्हणाले की कर्मचा-यांच्या संघटनासह भाजपचे आमदार पडळकर आणि खोत यांच्यासोबत वांरवार चर्चा झाल्या. त्यात काल ४१ टक्के अंतरीम पगारवाढ देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्यावर कर्मचारी संघटनानी विचार करून मार्ग काढावा आणि संप मागे घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले.
महागाई आणि घरभाडे भत्यासह मूळवेतनात वाढ(Hike in basic pay with inflation and house rent allowance)
परब म्हणाले की, पगारवाढीच्या प्रस्तावामध्ये महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता राज्य सरकारी कर्मचा-याप्रमाणेच देण्यात येइल. या शिवाय मूळ पगारात १ ते १० वर्ष सेवा करणा-या कर्मचा-यांना मूळ वेतन १२हजार आहे त्यांना पाच हजार रूपयांची पगारवाढ करत त्यांचे एकूण वेतन १७०८० होणार आहे. तर दहावर्षापेक्षा जात सेवा पूर्ण केलेल्या मूळ वेतन सोळा हजार पेक्षा जास्त असणा-या कर्मचा-यांना चार हजार पगारवाढ दिल्यावर स्थूल वेतन २३०४० आणि एकूण वेतन २८०४० होणार आहे. वीस वर्षापेक्षा जास्त सेवा देणा-या कर्मचा-यांच्या मूळ वेतनात २५०० रूपयांची वाढ करत त्यांना एकूण वेतन ४१०४० मिळणार आहे या शिवाय ३७ हजार पेक्षा जास्त मूळवेतन असणा-या कर्मचा-यांना एखून ५६८८० रूपये वेतन वाढ होणार आहे. या साठी दरमहा साठ कोटी राज्य सरकार देणार असून वर्षाला सातशे कोटीचा भार उचलणार आहे. असे परब म्हणाले
उद्या हजर झाल्यास निलंबन मागे(Suspension withdrawn if he appears tomorrow)
ते म्हणाले की या सोबतच पगार दहा तारखेपूर्वी करण्याची हमी घेतली असून चांगले उत्पन्न आण णा-या वाहकांना इनसेंटीव सारख्या योजना लागू केल्या जाणार आहेत. जे कर्मचारी निलंबीत आहेत त्यानी उद्या हजर झाल्यास निलंबन मागे घेतले जाईल मुंबईत आलेल्या कर्मचा-यानी परवा पर्यंत हजर व्हावे असे आवाहन त्यांनी केले. आत्महत्याग्रस्त कर्मचा-यांच्या कुटूंबाचा देखील सहानूभुतीपूर्वक विचार केला जाईल असे ते म्हणाले.