मुंबई : कमी पर्जन्यमान म्हणजेच पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ४ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने(State Election Commission) केली आहे. त्यानुसार आजपासून संबंधित ठिकाणी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
मदान म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 च्या आदेशानुसार, पावसामुळे विस्कळीत होण्याची शक्यता कमी असलेल्या 62 तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदार 5 जुलै 2022 रोजी निवडणुकीची माहिती प्रसिद्ध करतील. नामनिर्देशन पत्र 12 ते 19 जुलै 2022 या कालावधीत दाखल केले जातील. शासकीय सुट्टीमुळे 16 आणि 17 जुलै 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 जुलै 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 22 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होईल.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या: नाशिक: बागलाण- 13, निफाड- 1, सिन्नर- 2, येवला- 4, चांदवड- 1, देवळा- 13 आणि नांदगाव- 6. धुळे: धुळे- 2, साक्री- 49 आणि शिंदखेडा- 1. जळगाव: रावेर- 12, अमळनेर- 1, एरंडोल- 2, पारोळा- 3 आणि चाळीसगाव- 6. अहमदनगर: अहमदनगर- 3, श्रीगोंदा- 2, कर्जत- 3, शेवगाव- 1, राहुरी- 3 आणि संगमनेर- 3. पुणे: हवेली- 5, शिरुर- 6, बारामती- 2, इंदापूर- 4 आणि पुरंदर- 2. सोलापूर: सोलापूर- 2, बार्शी- 2, अक्कलकोट- 3, मोहोळ- 1, माढा- 2, करमाळा- 8, पंढरपूर- 2, माळशिरस- 1 आणि मंगळवेढा- 4. सातारा: कराड- 9 आणि फलटण- 1. सांगली: तासगाव- 1. औरंगाबाद: औरंगाबाद- 1, पैठण- 7, गंगापूर- 2, वैजापूर- 2, खुलताबाद- 1, सिल्लोड- 3, जालना- 6, परतूर- 1, बदनापूर- 19 आणि मंठा- 2. बीड: बीड- 3, गेवराई- 5 आणि अंबेजोगाई- 5. लातूर: रेणापूर- 4, देवणी- 1 आणि शिरूर अनंतपाळ- 4. उस्मानाबाद: तुळजापूर- 2, कळंब- 1, उमरगा- 5, लोहारा- 2 आणि वाशी- 1. परभणी: सेलू- 3. बुलढाणा: खामगाव- 2 आणि मलकापूर- 3. एकूण- 271.