हार्ट अटॅक पासून दूर राहा

हार्ट अटॅक ची काही लक्षणे (Some symptoms of a heart attack)-

तुम्हाला हार्ट अटॅक(heart attack)ची काही लक्षणे ही माहित असायला हवीत, जेणेकरून तुम्ही खूप जास्त सतर्क राहू शकता. थकवा येणे, झोप कमी लागणे, आंबट ढेकर येणे, सतत चिंता सतावणे, ह्रदयाची धडधड वाढत जाणे, हातांमध्ये कमजोरी जाणवणे किंवा जडपणा जाणवणे,अंगदुखी,पाठ दुखी, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, कमी भूक लागणे, हात पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेताना समस्या निर्माण होणे या सर्व गोष्टी म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. ही दिसू लागल्यावर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हार्ट अटॅकची कारणे(Causes of heart attack)-

लक्षणे तर आपण पाहिली पण हार्ट अटॅक नक्की कशामुळे येऊ शकतो जे जाणून घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा(Obesity), मधुमेह, हाय कोलेस्टेरॉल(High cholesterol), हाय बिपी, धुम्रपान, मद्यपान, हाय फॅट डायट ही सर्व हार्ट अटॅकची कारणे ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही या सर्व कारणांकडे लक्ष दिले पाहिजे. शक्य तितके जास्त हेल्दी जगा, हेल्दी खा आणि तंदुरुस्त रहा. यामुळे तुम्हाला असलेला हार्ट अटॅकचा धोका खूप जास्त कमी होऊ शकतो आणि तुम्ही अधिक काळ निरोगी आयुष्य जगू शकाल.

स्वत:चा कसा बचाव करावा ?

आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की स्वत:ला हार्ट अटॅक(heart attack) पासून वाचवावे कसे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे हृदय सुरक्षित राखायचे असेल तर आहारावर लक्ष द्या. सध्या धकाधकीच्या काळात हेल्दी आहाराकडे लक्ष राहत नाही आणि हेच हार्ट अटॅकला आमंत्रण ठरू शकते. शिवाय तुम्हाला धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर ही सवय सोडा. कोणत्याही प्रकारे धुम्रपान आणि मद्यपानाचे समर्थन करता येणार नाही. त्यामुळे निरोगी सवयी आत्मसात करा आणि स्वत:चा हार्ट अटॅक(heart attack) पासून बचाव करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Social Media