स्त्री 3 बद्दल राजकुमार रावने दिलं अपडेट; कधी येणार तिसरा पार्ट ?

यंदाची सर्वात सुपरहिट हॉरर कॉमेडी म्हणजे ‘स्त्री ३’ (Stree 3). स्त्री 2 हा भारतीय हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे, जो 2024 मध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 2018 च्या ‘स्त्री’चा सीक्वल आहे, जो खूप गाजला होता. चित्रपटाची कथा एका छोट्या शहरात बेतलेली आहे, जिथे एक विचित्र घटना घडते ज्यामुळे लोक घाबरतात. राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जीच्या तुफान कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. २०१८ साली आलेल्या ‘स्त्री’ चा हा सीक्वेल होता. ‘स्त्री २’ च्या शेवटी ‘स्त्री ३’ची हिंट दिली आहे. त्यामुळे आता तिसरा पार्ट कधी येणार याची चाहते आतापासूनच वाट पाहत आहेत. दरम्यान राजकुमार रावने (Rajkumar Rao) याविषयी अपडेट दिलं असून चाहते थोडे निराश होण्याची शक्यता आहे.

‘स्त्री’चा सीक्वेल यायला सहा वर्ष लागली. आता ‘स्त्री 3’साठीही अनेक वर्ष वाट पाहायला लागण्याची शक्यता आहे. न्यूज १८ शी बोलताना राजकुमार म्हणाला, “स्त्री ३ नक्कीच येणार आहे. पण अजून याची काहीच तयारी सुरु झालेली नाही. सीक्वेल किती कमाई करेल हे सोडून सिनेमा कसा चांगला बनवता येईल यावर टीम काम करत आहे. दोन्ही सिनेमांमध्ये ६ वर्षांचा कालावधी होता. चांगल्या क्वॉलिटीचा प्रोजेक्ट बनवायचा असेल तर तेवढा वेळही लागतो. स्त्री ३ वेळ घेऊ शकतो. हा पण अगदीच ६ वर्ष लागणार नाही. दिग्दर्शक अमर कौशिक, निर्माते दिनेश विजान आणि लेखकांची टीम चांगली स्टोरीवर लक्ष देत आहे.”

‘स्त्री २’ ने बॉक्सऑफिसवर ६०० कोटींची कमाई केली. यावर्षीचा हा सर्वात ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. मॅडॉक फिल्म्सच्या निर्मितीखाली ‘स्त्री’ शिवाय ‘भेडिया’, ‘मुंज्या’ हेही सिनेमे बनले आहेत. आता आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाला घेऊन आणखी एक हॉरर कॉमेडी येणार आहे. याचीही हिंट त्यांनी ‘स्त्री २’च्या शेवटी दिली होती.

 

‘पुष्पा 3: The Rampage’ जाणून घ्या कोण साकारणार अल्लू अर्जुनच्या मुलाची भूमिका ?  

Social Media

One thought on “स्त्री 3 बद्दल राजकुमार रावने दिलं अपडेट; कधी येणार तिसरा पार्ट ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *