स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा !: नाना पटोले

मुंबई : आगामी जिल्हा परिषद(Zilla Parishad), महानगरपालिका(municipal), नगरपालिका निवडणुका महत्वाच्या असून या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले( Nana Patole) यांनी केले आहे. टिळक भवन येथे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल व विभाग प्रमुखांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल व विभाग प्रमुखांची बैठक संपन्न.

A meeting of district presidents, MLAs, all cell and department heads was held.

पटोले पुढे म्हणाले की, खा. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाला लढणारे कार्यकर्ते हवे आहेत, पक्षासाठी काम करा, कसलीही तडजोड न करता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी उंचावेल यासाठी झोकून देऊन काम करा. महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या पसंतीला उतरले असून दिड वर्षाच्या कालावधीत झालेल्या विधान परिषद निवडणुकांसह ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झालेली आहे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा, नव्या उत्साहाने व ताकदीने कामाला लागा.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, आ. शरद रणपिसे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, किसान काँग्रेसचे शाम पांडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, वामसी रेड्डी, एनएसयुआयचे आमिर शेख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रमोद मोरे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

The upcoming Zilla Parishad, municipal, municipal elections are important and strengthen the party organization slot for this election. Maharashtra Pradesh Congress Committee President Nana Patole has urged them to strengthen the construction of booth committees and work for the congress party’s resounding success in this election. A meeting of district presidents, MLAs, all cell and department heads was held at Tilak Bhawan. He was speaking while guiding the meeting.

Social Media