राज्यात कोरोनाच्या ब्रेक द चेनसाठी, १ जूनपर्यंत कडक निर्बंध !

मुंबई : कोविड-१९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारने टाळेबंदी निर्बंध १४ एप्रिल पासून लागू केले आहेत. ते आता १जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवत असल्याचा अधिकृत आदेश निर्गमीत करून सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यात शहरी भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण आता उतरणीला लागले असले तरी ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानेच सध्या लागू असलेले कठोर निर्बंध मे अखेर पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

रुग्णवाढीचा दर कमी झाला(Patient growth rate slows down)

राज्यातील कोरोनाचा  उद्रेक रोखण्यासाठी राज्यात १४ एप्रिलपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आधी हे निर्बंध १ मेपर्यंत होते व नंतर १५ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत शनिवारी संपत असल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. या निर्बंधामुळे राज्यात कोरोनाची  साथ नियंत्रणात आली असून राज्याचा रुग्णवाढीचा दर कमी झाला आहे. १० ते १५ जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा कमी झाला असला तरी अजूनही काही जिल्हयात बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्याचे निर्बध आणखी १५ दिवस वाढविण्याची मागणी बहुतांश मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यानुसार हा निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे.

 

अन्य राज्यातून येताना आरटीपीसीआर बंधनकारक

RTPCR mandatory while coming from other states

आज जाहिर झालेल्या मार्गदर्शक सूचनां मध्ये  ठाकरे सरकारने निर्बंध अजून कठोर केले असून बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही मार्गाने  प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट असणे बंधनकारक असून प्रवेश कऱण्याच्या ४८ तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा असे आदेशात नमूद आहे. दरम्यान देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील.

केवळ दोघांनाच परवानगी(Only two allowed)

दरम्यान कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी केवळ दोघांनाच परवानगी असणार आहे. जर हे कार्गो कॅरिअर बाहेरच्या राज्यातून प्रवेश करत असतील तर निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असून ४८ तासांच्या आत तो काढलेला असावा. स्थानिक बाजारपेठा तसेच एपीएमसीवर पालिकांनी लक्ष ठेवून करोनाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी असेल. जर एखाद्या ठिकाणी नियमांचे पालन होत नसेल किंवा परिस्थिती हाताळणे शक्य होत नसेल तर स्थानिक प्रशासन तिथे निर्बंध वाढवण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.

विमानतळ बंदर कर्मचाऱ्यांना प्रवास मुभा(Airport port employees allowed to travel)

औषधे आणि करोनाशी संबंधित सामग्रीसाठी प्रवास करावा लागणाऱ्या विमानतळ आणि बंदरावरील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी निर्बंध वाढवायचे असल्यास स्थानिक प्रशासनाकडे हक्क देण्यात आले असून यासाठी निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास आधी नोटीस द्यावी असे सागंण्यात आले आहे.

The state government has imposed lockdown restrictions under Break the Chain from April 14 to prevent infection of the Covid-19 virus. The revised guidelines have been issued by issue an official order that they are now extending it till 7am on June 1. Although the incidence of corona infection in urban areas in the state is now declining, it was decided in the state cabinet meeting to continue the stringent restrictions currently in force till the end of May as the incidence of corona continues in rural areas.

Social Media