देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असतात. सरकारच्या अनेक योजनांचा विद्यार्थांना आर्थिक, शैक्षणिकदृष्टीने फायदा होतो. यातील एक योजना म्हणजे स्वाधार योजना(Swadhar Scheme). महाराष्ट्र(Maharashtra) सरकारने स्वाधार योजनेला सुरुवात केली होती.
कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हे यामागचे मुख्या उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज, युनिव्हर्टीकडून वसतिगृहाची सुविधा मिळते. स्वाधर योजनेअंतर्गत 51 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनाचा लाभ घेता येईल.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती या विद्यार्थांना आर्थिक मदत मिळणार आहे. यात किमान 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत दिली जाते.
योजनेच्या अटी :Terms of the Plan:
▪️या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
▪️10वी आणि 12वी नंतर प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी 2 वर्षांपेक्षा जास्त नसावा.
▪️या विद्यार्थ्यांना 60 टक्के गुण असावेत. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना 40 टक्के गुण असावेत.
▪️याशिवाय विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचे स्वतः चे बँकेत खाते असणे महत्त्वाचे आहे.