परीक्षा ऑनलाईन घेण्याचा मागणीसाठी नागपुरात विद्यार्थी रस्त्यावर

नागपूर : कोरोनामुळे यंदाही शाळांनी संपुर्ण वर्ष दहावी, बारावीचे वर्ग ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आले असतांना आता परीक्षा सुद्धा ऑनलाईनच घ्या या प्रमुख मागणीसाठी नागपुरात दहावी, बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.

नागपुरातील क्रीडा चौकात शेकडो विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाचा विरोधात नारेबाजी केली , या दरम्यान काही विद्यार्थी आक्रमक झाल्याने नागपूर महापालिकेच्या स्टार बसच्या काचाही फोडल्या . यावेळी तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता विद्यार्थी आपल्या मागण्यांवर अडून बसले होते, मात्र पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका घेत विद्यार्थ्यांना शांत केले.

विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले . शाळेचे वर्ग ऑनलाईन झाले असतांना मंडळातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा विचारात आहे. मात्र या निर्णयाला आता विद्यार्थ्यांकडून विरोध झाल्याचे बघायला मिळाले.

मुंबईत ही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड(Education Minister Varsha Gaikwad) यांच्या निवास्थानासामोर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले .
दरम्यान आपण विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे , यामागे कोणाची चिथावणी होती याबाबत तसेच या आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. Students on the streets in Nagpur demanding that exams be conducted online

Social Media