आपण सुंदर त्वचा मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो जेणेकरून आपली त्वचा चांगली राहील. आपल्या त्वचेच्या काळजीसाठी लक्षात ठेवा काही गोष्टी
- जर तुम्ही कोणतीही डर्मा प्रक्रिया पूर्ण करत असाल तर सनस्क्रीन आणि नाईट क्रीम नियमित लावणे फार महत्वाचे आहे. घराबाहेर पडताना सनस्क्रीन आणि रात्री झोपताना नक्कीच नाईट क्रीम लावा.
- सनस्क्रीन किमान एसपीएफ 40 असणे आवश्यक आहे किंवा सनस्क्रीन वापरण्यापूर्वी आपण त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
- महिलांमध्ये सनस्क्रीनबाबत बरेच संभ्रम आहेत. तेलकट त्वचा, इनडोर ट्यूबलाइट, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, बल्ब लाइटसच्या प्रकाशाने देखील पिगमेंटेशन होऊ शकते. यापासून वाचण्यासाठी घरी असतांना देखील सनस्क्रीन वापरावे.
- तेलकट त्वचेच्या स्त्रियांसाठी सिलिकॉन किंवा वॉटर-बेस्ड सनस्क्रीन सर्वोत्तम आहे.
- हिल स्टेशन, बीच येथे फिजिकल सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे जेणेकरून आपण सूर्यप्रकाशाच्या हानिकारक प्रभावांपासून दूर राहाल आणि त्याचा आपल्या त्वचेवर काही परिणाम होणार नाही.
- मान, हात आणि शरीराच्या सर्व उघड भागांवर सनस्क्रीन लावू शकता.
- आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, दिवसातून 2 पेक्षा जास्त वेळा फेसवॉशने चेहरा धुवू नये तसेच, साबणाने देखील जास्त चेहरा धुणे टाळावे.
- व्हिटॅमिन सी युक्त नाईट क्रीम वापरा.
- आहारात सर्व रंगांच्या भाज्या समाविष्ट करा. प्रत्येक फळात भिन्नभिन्न अँटी-ऑक्सिडंट्स असतात. शाकाहारी असल्यास आपल्या आहारात मोड आलेल्या कडधान्याचा वापर अवश्य करावा.
एखादे उत्पादन तुमच्या मित्राला किंवा अन्य कोणास अनुकूल असेल तर ते तुम्हालाही सुट होईल असे नाही. प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार हा वेगळा असतो. म्हणूनच आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश, क्रीम, मॉश्चरायझर निवडणे गरजेचे आहे.आठवड्यातून एकदातरी घरगुती फेस पॅक वापरा, तसेच त्वचेवर स्क्रब करा जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मग हरभरा पीठ आणि मध समान प्रमाणात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. स्क्रबिंगसाठी लिंबू आणि साखर मिसळून चेहऱ्यावर स्क्रब करा.