अहमदनगर कोरोना बळी प्रकरणी शल्यचिकित्सक निलंबित

अहमदनगर :  जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेला. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा आणि एक स्टाफ नर्सेसला निलंबित करण्यात आले आहे, तर यामध्ये दोन नर्सेसची सेवा समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता नर्सेसमध्ये संताप उमटला असून आम्हाला सर्वांनाच निलंबित करा. आमची काय चूक ? अग्निशामक यंत्रणा बसवणे हे काय आमचे काम आहे का ? असा सवाल महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा आंधळे यांनी केला.

जिल्हा रुग्णालयातील सर्व नर्सेस काम सोडून बाहेर आल्या असून आम्हाला निलंबित करा किंवा त्यांचे तरी निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. आमची मागणी सरकारकडे पोहोचवा असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही आमची जीव धोक्यात घालून काम केले.

जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आग अग्निशमन यंत्रणा नसल्याने लागली आहे. अग्निशमन यंत्रणा बसवणे काय आमचं काम नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सर्व नर्सेसचे निलंबन मागे घ्या अशा घोषणा जिल्हा रुग्णालयातील नर्सेसनी दिल्या.

Eleven people were killed in a fire in the intensive care unit of the district hospital. District surgeon Sunil Pokhrana and a staff nurse have been suspended in the case while two nurses have been terminated in the case. So now there is anger among the nurses and suspend us all. What’s wrong with us? Is it our job to install fire extinguishers? This was questioned by Maharashtra Health Care Nurses Association president Surekha Andhale.

Social Media