सुशांतच्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयकडे केली मागणी

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत चे निधन हे आत्महत्या आहे कि हत्या आहे, हे उघडकीस करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयकडे केली असून सीबीआयने लवकरात लवकर या गोष्टीचे सत्य प्रकट करावे, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत अनिल देशमुख म्हणाले, “महाराष्ट्र आणि देशातील जनता सीबीआयच्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत. सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी लोक मला या खटल्याची स्थिती विचारत आहेत. मी सीबीआयला लवकरच विनंती करेन की लवकरात लवकर सांगा की ती आत्महत्या होती की हत्या होती.

अनिल देशमुख म्हणाले, ‘जेव्हापासून हे प्रकरण सीबीआयकडे पाठविण्यात आले त्याला 5 ते 6 महिने झाले आहेत. आता सीबीआयने आपला अहवाल सार्वजनिक केला पाहिजे, जेणेकरून सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली होती की त्याची हत्या करण्यात आली होती हे जनतेसमोर स्पष्ट होऊ शकेल. सुशांतसिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. 19 ऑगस्ट रोजी बिहार पोलिसांची एफआयआर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयकडे वर्ग करण्यात आली होती अलीकडेच एम्सने आपल्या अहवालात सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येचे प्रकरण नोंदवले होते.

सुशांतसिंग राजपूत बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या निधनानंतर मुंबई पोलिस, सीबीआय, ईडी आणि एनसीबी सारख्या संस्थांनी तपास केला आहे. सुशांतच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता. त्याच्या निधनानंतर सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी त्याचे चाहते अजूनही सोशल मीडियावर प्रचार करत आहेत.

 

Tag-Maharashtra Home Minister Anil Deshmukh/demand to CBI/Sushant’s death case

Social Media