उत्तिष्ठत ! जाग्रत !!

स्वामी विवेकानंद(Swami Vivekananda) एक तेजस्वी व्यक्तीमत्व! ज्यांनी आपल्या ओघवत्या व सोप्या भाषेतून पाश्चिमात्य देशात आपल्या धर्मासंबंधी व देशा संबंधी परिचय करून दिला. भारताच्या वेदांत धर्माला सर्वधर्म परिषदेत सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले. असे थोर योगी. एक अनादि महापुरुष, आदित्यासारखा ज्याचा वर्ण, अज्ञान ज्याला स्पर्श करू शकत नाही, असे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी विवेकानंद.

सुदृढ बांधा, डौलदार शरीरयष्टी आणि वाक्चातुर्य यांद्वारे कित्येकांना नामोहरण करणारे व नतमस्तक करावयास लावणारे ब्रम्हचारी नरेंद्रनाथ !

अत्यंत खोडकर स्वभावाचा, आईवडिलांच्या नाकी नऊ आणणारा निर्भय बिले म्हणजेच, भारतात अन्यायाविरुद्ध चळवळ उभारणारे, गरीबासाठी झटणारे आणि स्त्रीयांना मातेसमान मानणारे, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद !
स्वामी विवेकानंदांचा जन्म दि. १२ जाने. १८६३ ला भुवनेश्वरीदेवी च्या पोटी झाला. वीरेंश्वर हे त्यांचं दुसरं नाव, तर बिले हे टोपण नाव.

नरेंद्रनाथ(Narendranath) जन्मजात योगी होते. ते सहजतेने ध्यान लावू शकत. एकदा तर ते ध्यानस्थ असताना एक नाग त्यांच्या अंगावरून गेला तरी त्यांना काहीही कळले नाही. सन १८७९ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापिठाची प्रवेश परिक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण केली. नरेंद्रनाथ सर्वगुण संपन्न होते. यांना वाचनाची, संगीताची सुद्धा गोडी होती.
ते म्हणत शिक्षण म्हणजे मानवाच्या ठाई आधीच वास करीत असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. माणूस घडवू शकतील आणि चारित्र्याची योपासना करतील असे विचार आत्मसात करणे हे शिक्षण होय. आजच्या पिढीला चारित्र्य संपन्न होण्यासाठी अश्या शिक्षणाची गरज आहे.

“आपण देव पाहिला आहे कां ?” या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर त्यांना दि. १५ जाने. १८८२ ला ईश्वरी साक्षात्कार झालेल्या रामकृष्ण परमहंसा कडूनच मिळाले. आणि त्यांच्या पासूनच नरेंद्रनाथांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. श्री रामकृष्ण परमहंसांच्या सानिध्यात नरेंद्रनाथांची अध्यात्मिक प्रगती वेगाने होवू लागली. श्री रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्र नावाच्या हिऱ्याला पैलू पाडले, घडविले. इतकेच नव्हे तर स्वत:ची अध्यात्मिक शक्ती स्वामीजींना संक्रमित केली.

रामकृष्ण परमहंसांनी समाधी घेतल्यानंतर आपली मातृभूमी आणि आपला समाज या विषयीचे साक्षात ज्ञान प्राप्त करण्यासाठी नरेंद्रनाथ भरतखंडाची यात्रा करण्यासाठी निघाले.
सारे मानव समान आहेत आणि एकमेकांचे बंधू आहेत अशी त्यांची श्रद्धा होती. याच काळात महाराजा अजितसिंहाने त्यांना ‘स्वामी विवेकानंद’ हे नाव दिले.
स्वामीजी नेहमी म्हणत ‘उठा, जागे व्हा’| ‘जे जे भयावह असेल त्याच्याशी सामना करा, त्याला धैर्याने टक्कर द्या’|. भित्र्या माणसांना कधीही यश प्राप्ती होत नाही. त्या काळी त्यांनी जनतेला दिलेला हा उपदेश आजही युवकांना उप युक्त आहे.

११ सप्टें. १८९३ ला शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत सहभागी होण्याचे ठरविले आणि ३१ मे १८९३ ला पश्चिमेकडे निघून ते महत्प्रयासाने शिकागोला पोहचले. त्यांनी भारताच्या वेदांत धर्माला सर्वधर्मपरिषदेत सर्वोच्च स्थान प्राप्त करुन दिले. त्यांच्या ‘माझ्या अमेरिका निवासी बंधू भगिनींनो!’ या शब्दांनी श्रोत्यांची अंतःकरणे हेलावून टाकली. त्यांच्या अंतःकरणाला व्यापून असणाऱ्या मातृत्वाने साद देताच त्याचे पडसाद उपस्थीत श्रोत्याच्या अंतःकरणात उठले आणि मानवातील एकतेचा अनुभव त्यांना आला. विज्ञानाने भौतिक प्रगती साधता येईल. परंतु शाश्वत सुखाचा ठेवा अध्यात्मिक साधनेतुनच मिळेल. विज्ञान आणि अध्यात्माची योग्य सांगड घातल्यास विश्व शांती सहज शक्य आहे असा विश्वास त्यांना होता.त्यांची प्रतिमा बहुमुखी होती. माझ्या नावाला प्राधान्य न देता माझे विचार प्रत्यक्षात यावेत असा संदेश विवेकानंदांनी दिला आहे.

इंग्लंड, इटली, जर्मनी या देशात जावून प्रवचने दिली. एवढेच नाही तर तिथे वेदांचा प्रचार करणाच्या संस्था स्थापन केल्या. आणि या कार्यात पाश्चिमात्यांची त्यांना उत्तम साथ मिळाली.
रामकृष्ण परमहंस यांनी समाधी घेतल्यानंतर आपली मातृभूमी आणि आपला समाज या विषयीचे साक्षात ज्ञान प्राप्त करण्यासाठी नरेंद्रनाथ भरतखंडाची यात्रा करण्यासाठी निघाले.
सारे मानव समान आहेत आणि एकमेकांचे बंधू आहेत अशी त्यांची श्रद्धा होती. याच काळात महाराजा अजितसिंहाने त्यांना स्वामी विवेकानंद’ हे नाव दिले.

स्वामीजी नेहमी म्हणत ‘उत्तिष्ठत जाग्रत’ ‘उठा, जागे व्हा. ‘जे जे भयावह असेल त्याच्याशी सामना करा, त्याला धैर्याने टक्कर द्या’, भित्र्या माणसांना कधीही यश प्राप्ती होत नाही. दीर्घ रात्र संपत आहे आपल्या भारतमातेची दीर्घ निद्रा संपून ती जागृत होत आहे. एखाद्या प्रचंड शिलेसारखे अखंड उभे राहा; तुम्ही अविनाशी आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्ही विश्वात्मा आहात, तुम्ही विश्वेश्वर आहात. सिंहाप्रमाणे मुक्त होऊन बाहेर पडा. त्या काळी त्यांनी जनतेला दिलेला हा उपदेश आजही युवकांना उपयुक्त आहे. कारण आपण अजूनही पूर्णपणे निर्भय झालो नाही, छोटयाशा पराभवानेंही धैर्य सोडून देतो, बिकट परिस्थितीला तोंड देण्याची आपली अजूनही मनाची पूर्ण तयारी झालेली नाही.

आदर्श स्त्री-जीवन म्हणताच, एकमात्र मातृभावाचीच कल्पना आम्हा भारतीयांच्या मनात येते. “आई” म्हणूनच आपण भगवंताला आळवतो. स्त्रीयासंबंधी स्वामीजींच्या मनात फार सन्मान होता. ते म्हणत ‘स्त्रीयांची प्रगती झाल्याशिवाय भारताची उन्नती होऊ शकणार नाही. भारतीय स्त्रीला सीतेच्या पदचिन्हाचे अनुसरण करुन आपल्या विकासाचा प्रयत्न केला पाहिजे.’ स्वामीजींनी भारतीय जनतेला दिलेला संदेश, आजही भारतीयांना मोलाचा आहे.
स्वामी विवेकानंद हे सार्याि मानवतेच्या अध्यात्मिक आशा आकांक्षांचे मूर्त रूप होते. मानवाचा सर्वश्रेष्ठ विकास फक्त त्यागानेच होऊ शकतो दुसऱ्यांसाठी जो जितका अधिक त्याग करील इतका तो मानवात श्रेष्ठता पावेल असं त्यांचं मत होतं.

आपण परकीय गुलामगिरीतून जरी मुक्त झालो असलो तरी धर्मभेद, जातीभेद आणि प्रांत- भेद नष्ट झाला नाही. अजूनही राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता’ भारतीय जनतेत रुळली नाही. स्त्रीयांना अजूनही पूर्ण स्वातंत्र्य मिळाले नाही, त्या आत्मनिर्भर होऊ शकल्या नाहीत, हे आज घडणाऱ्या निरनिराळ्या घटनांवरून स्पष्ट होते. म्हणूनच आजही स्वातंत्र्याच्या अमृत  महोत्सवी वर्षात “लडकी हुं, लढ सकती हुं|” असा नारा द्यावा लागतो, हे दुर्दैव आहे.
विवेकानंदांनी दिलेला ‘उत्तिष्ठत जाग्रत.. हा मोलाचा उपदेश आत्मसात करून जीवन कार्यास प्रारंभ करणे काळाची गरज आहे. “आत्मनिर्भर भारत” हा आजचा परवलीचा शब्द. अशावेळी यालाच पूरक विचा स्वामी विवेकांन्दानी मंडले होते. ते म्हणायचे,” उठा, धीट बना, शक्तीसंपन्न बना. तुम्ही सगळी जबाबदारी स्वत:च्या शिरावर घ्या आणि जाणून असा की तुम्हीच आपल्या भाग्याचे निर्माते आहात. तुम्हाला हवे असलेले सर्व सहाय्य व सर्व बल तुमच्या मध्येच आहे. म्ह्णून तुम्हीच स्वत:चे भवितव्य घडवा.

भारताच्या प्राचीन अध्यात्मिक संपदेने समृद्ध झालेल्या, ब्रम्हज्ञ स्वामी विवेकानंदानी आधुनिक मानवाच्या आणि विशेषत: भारतीयांच्या समस्त शुभ आशा-आकांक्षा आपल्या ओजस्वी, प्रखर वाणीने प्रज्वलित केल्या आणि त्यांच्यात जणू प्राण फुंकले. स्वामी विवेकानंदांना त्यांच्या जयंती दिनी शत शत नमन.

श्रीकांत भास्कर तिजारे
भंडारा ९४२३३८३९६६

Social Media