मुंबई, दि. 6 : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपासाला वेग आला आहे. चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनी वांद्रे पोलिस स्टेशन गाठले आणि त्यांनी त्यांचा जबाब नोंदवला. पोलिसांनी भन्साळी यांची जवळपास 3 तास चौकशी केली गेली. सुशांतसिंह राजपूत यांना देण्यात आलेल्या चित्रपटांबद्दल प्रश्न विचारले गेले.
या प्रकरणात भन्साळी यांचे नाव समोर आले होते जेव्हा चित्रपटाचे समीक्षक सुभाष के झा यांनी सुशांतला संजय लीला भन्साळी यांनी तीन चित्रपटांसाठी संपर्क साधल्याचे उघड केले होते. यामध्ये बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला राम-लीला आणि पद्मावत यांचा समावेश होता. सुशांतच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलीस अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तींसह अनेक चित्रपटाशी संबंधीत व्यक्तींशी विचारपूस करण्यात आली आहे.
चित्रपटाचे समीक्षक सुभाष झा यांनी सांगितले होते की,“जेव्हा सुशांत सिंह पाणी या चित्रपटाची तयारी करत होता. तेव्हा त्याला बाजीराव मस्तानी ऑफर केले गेले होते. संजय लीला भन्साळी यांनी स्वत त्यांना सांगितल्याचे ते म्हणाले होते. पण सुशांतला हा चित्रपट करता आला नाही. त्यानंतर भन्साळीने सुशांतला गोलियों की रासलीला राम-लीला आणि नंतर पद्मावतमध्ये भूमिकेची ऑफर दिली होती. आजच्या काळात संजय लीला भन्साळी सर्वात मोठे दिग्दर्शक आहेत आणि सुशांत त्यांचे तीन चित्रपट स्वीकारू शकला नाही. यानंतर, या नगरीत बॉयकॉट केले जात असल्याच्या चर्चांना कितपत खरे मानले जावे किंवा त्यावर किती प्रमाणात विश्वास ठेवायचा..
सुशांतला चित्रपटसृष्टीत काम मिळणे बंद झाल्यानंतर सुभाष झा यांचे हे विधान समोर आले. ज्यामुळे तो तणावात होता. अव्वल दिग्दर्शक सुशांतबरोबर काम करण्यास तयार नव्हते या बातम्यांना त्यांनी नाकारले आहे. या सर्व बातम्यांना चुकीचे म्हणत सुभाष झा यांनी स्पष्ट केले की सुशांतच्या बाबतीत अशा गोष्टी समोर येत आहेत ज्यात काहीच तथ्य नाही. दुसरीकडे सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्याचे चाहते या चित्रपटाची प्रतिक्षा करीत आहेत. यात सुशांतच्या अपोझिट संजना सांघी या अभिनेत्रीने काम केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा यांनी केले आहे.