‘भोला’ चित्रटात अजय देवगणसोबत दिसणार तब्बू , शूटिंग सुरू

मुंबई :  भोला या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत( Ajay Devgn) तब्बू (Tabu )महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने या चित्रपटात काम करत असल्याबाबतची घोषणा इन्स्टाग्रामवर केली आहे. भोला हा चित्रपट तामिळ सुपरहिट चित्रपट कैथीचा रिमेक असेल. तब्बूने चित्रपटाचा क्लॅपबोर्ड शेअर केला आहे. चित्रपटाच्या क्लॅपबोर्डवरील चित्रावर लिहिले आहे, ‘नवीन सुरुवात’ यासह  अनेकांना टॅगही केले आहे.

तब्बूने ‘भोला’ लिहिलेला क्लॅपबोर्ड  केला शेअर

तब्बूने(Tabu ) शेअर केलेल्या क्लॅपबोर्डवर भोला असे लिहिले आहे. याआधी 2020 मध्ये अजय देवगणने सांगितले होते की, तो तमिळ सुपरहिट चित्रपट ‘कैथी’च्या हिंदी रिमेकवर काम करत आहे. त्याने या चित्रपटाची निर्मितीही करणार असल्याचे सांगितले होते. धर्मेंद्र शर्मा याचे दिग्दर्शन करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

सिंघम ३ मध्ये अजय देवगण दिसणार आहे

भोला हा चित्रपट एका आरोपीभोवती फिरतो जो आपल्या मुलीच्या शोधात निघतो. मात्र, त्याचा सामना ड्रग माफियाशी होतो. अजय देवगण( Ajay Devgn) सिंघम ३ मध्ये दिसणार आहे. तो नुकताच सूर्यवंशी या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे. अजय देवगणने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.त्याचे चित्रपट खूप पसंत केले गेले आहेत.त्याने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे.अजय देवगण अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो.

अजय देवगण हा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहे

अजय देवगण हा अभिनेता व्यतिरिक्त चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे.त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.त्याच्या भूमिकांना खूप पसंती मिळाली आहे. तो लवकरच रुद्र या वेबसिरीजमध्येही दिसणार आहे. तो गंगूबाई काठियावाडी आणि आरआरआर  या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. अजय देवगण सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांशी संबंधित अपडेट्स देत असतो. यामुळे त्याचे चाहते देखील उत्साहित आहेत.

Social Media