आपण सध्या पाहतो की त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मुली खूप मेहनत करतात. त्यासाठी अगदी महागड्या क्रीम वापरण्यास देखील मागेपुढे पाहत नाहीत, परंतु तुम्हाला माहित आहे का काही घरगुती उपचारांद्वारे देखील आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकतो. आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याचा वापर केल्याने केवळ त्वचेसंबंधित समस्या दूर होणार नाहीत तर चेहऱ्यावर त्वरित चमक देखील येईल.Take care of your skin with these things.
हळद लावल्याने चेहरा होतो गोरा (Face will be fair with turmeric)-
त्वचेवरील मुरुमे आणि जुन्या डागांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी हळद प्रभावी आहे. हळद त्वचेला कोमल आणि सुंदर बनविण्यासाठी देखील मदत करते. हळदीमध्ये एँटी-इंफ्लेमेंट्री गुणधर्म (Anti-Inflammatory Properties)आढळतात, जे त्वचेला बाहेरील संसर्गापासून वाचविण्यासह रंग गोरा करण्यास देखील मदत करतात. यासाठी तुम्ही चेहऱ्याला हळदीचा लेप (turmeric paste)लावा आणि चेहरा काही तासांनी स्वच्छ धुवा.
Beauty Tips : अंड्याच्या मदतीने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतात दूर….
कोरफड लावल्याने चेहऱ्यावर येते चमक (Aloe vera brings glow to the face)-
तुम्ही कोरफड लावून आपल्या त्वचेची विशेष काळजी घेऊ शकता. कोरफडचा (Aloe vera)उपयोग आयुर्वेदात बऱ्याच काळापासून औषध म्हणून केला जात आहे. कोरफडमध्ये आढळणारे औषधी गुणधर्म त्वचेशी संबंधित समस्या दूर करतात आणि त्वचेचा कोरडेपणा दूर करून त्वचेला हायड्रेटेड (Hydrated)बनवितात. याचा वापर केल्याने त्वचेवरील पुरळ, खाज आणि लालसरपणा दूर होतो आणि चेहऱ्यावर चमक येते.
beauty-tips : त्वचा आणि केसांसाठी बीटाच्या मास्कचे फायदे
कडुनिंबाचा असा करा वापर (How to use Neem)-
कडुनिंबात आढळणारे नैसर्गिक गुणधर्म त्वचेच्या अनेक मोठ्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. यासाठी कडुनिंबाचा फेसपॅक लावणे आवश्यक आहे. कडुनिंबाच्या पानांची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास मुरूमे दूर होतात आणि त्वचा सुंदर बनते.
These three things will make the face beautiful, blemishes and acne will disappear, know other benefits.
Beuty Tips : दुधीभोपळ्याच्या सालीचा आरोग्य आणि सौंदर्यासाठी असा करा वापर….
Beuty Tips : दुधीभोपळ्याची साल आरोग्य आणि सौंदर्यासाठी फायदेशीर!