सुकन्या समृद्धी योजना
मुलीचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना लाभदायक ठरू शकते. मुलीच्या नावे किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या TAX DEDUCTION चा लाभ घेता येतो. 8.2% व्याज या योजनेतील गुंतवणुकीवर सध्या मिळत आहे
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
1 हजार रुपयापासून 30 लाख रुपयापर्यंतची गुंतवणूक ज्येष्ठ नागरिक करू शकतात. आयकर कपातीच्या कक्षेत येणाऱ्या ज्येष्ठांना TAX DEDUCTION चा ही लाभ मिळतो. 8.2% दराने या योजनेतील जमा रकमेवर व्याज मिळत आहे
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
यातील गुंतवणूक सुरक्षित असून हमखास परतावा मिळतो. किमान 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येते, कमाल मर्यादा नाही. 1.5 लाख रुपयापर्यंतच्या गुंतवणुकीवर TAX DEDUCTION चा लाभ मिळतो. सध्या 7.7% दराने या योजनेत व्याज मिळत आहे