दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन(Teacher’s Day) साजरा केला जातो. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan)यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे एक कुशल प्रशासक, एक उत्कृष्ट शिक्षक, एक कुशल तत्त्वज्ञ आणि एक चांगले लेखक होते. प्रत्येक माणसाच्या जीवनात त्याच्या गुरूचा सर्वात मोठा हात असतो. गुरूशिवाय कोणत्याही शिष्याच्या जीवनाला योग्य दिशा मिळू शकत नाही.
यानिमित्ताने देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून अनेक उत्सवांचे आयोजन केले जाते. शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन(Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांच्या विचारांचा आपण विचार करूया….
देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षांहून अधिक वर्षे विद्यार्थ्यांना शिकवण्यात घालवली. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी तामिळनाडूच्या तिरुमणी गावात झाला. त्यांच्या वडिलांना डॉ.राधाकृष्णन यांना पुजारी बनवायचे होते, तसेच राधाकृष्णन यांनी इंग्रजी शिक्षण घ्यावे अशी त्यांची इच्छा नव्हती. पण त्यांचा मुलगा एके दिवशी देशाच्या सर्वोच्च पदावर बसेल हे त्यांना माहीत नव्हते.
खरे तर डॉ.राधाकृष्णन राष्ट्रपती असताना त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी डॉ.राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी डॉ. राधाकृष्णन म्हणाले की, माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी तो शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास मला अभिमान वाटेल. तेव्हापासून दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. 1962 मध्ये पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार (Dr. Sarvepalli Radhakrishnan)
– केवल निर्मल मन वाला व्यक्ति ही जीवन के आध्यात्मिक अर्थ को समझ सकता है। स्वयं के साथ ईमानदारी आध्यात्मिक अखंडता की अनिवार्यता है.
– ज्ञान हमें शक्ति देता है, प्रेम हमें परिपूर्णता देता है.
– कोई भी आजादी तब तक सच्ची नहीं होती,जब तक उसे विचार की आजादी प्राप्त न हो. किसी भी धार्मिक विश्वास या राजनीतिक सिद्धांत को सत्य की खोज में बाधा नहीं देनी चाहिए.
– किताबें पढ़ने से हमें एकांत में विचार करने की आदत और सच्ची खुशी मिलती है. पुस्तकें वो साधन हैं, जिनके माध्यम से हम विभिन्न संस्कृतियों के बीच पुल का निर्माण कर सकते हैं.