Jhund Teaser : ‘झुंड’चा टीझर रिलीज; बिग बींचा हटके अंदाज

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ या चित्रपटाचा टीझर(Teaser of ‘Jhund’ released) नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे. टीझरमधील अमिताभ बच्चन यांच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित

झुंड या चित्रपटाची कथा फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित असल्याचे बोलले जात आहे. जवळच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांनी स्वतःची फुटबॉल टीम तयार केली. याच कथेवर आधारित ‘झुंड’ हा चित्रपटही येणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षी 18 जून रोजी रिलीज होणार होता पण नंतर रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

टीझरमध्ये अमिताभ बच्चन प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. त्यांचा ‘अँग्री यंग मॅन’ अंदाज या चित्रपटात पुन्हा पाहायला मिळणार आहे, असा अंदाज अनेकांनी टीझर पाहिल्यानंतर बांधला आहे. टीझरमध्ये अमिताभसोबत काही लहान मुलांची टीमही दिसत आहे. 4 मार्चला संपूर्ण टीम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे यांनी एक टीझर शेअर केला आहे.

Social Media