Beauty Tips : सुंदर चेहऱ्यासाठी शरीरात ‘ही’ जीवनसत्वे असणे आवश्यक!

beauty tips : आजच्या काळात प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते, यासाठी महागडी उत्पादने खरेदी केली जातात. जर तुम्हालाही चमकदार आणि नितळ त्वचा हवी असेल तर तुम्हाला तुमच्या आहारावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण काही व्हिटॅमिन्स (जीवनसत्व) असे आहेत, ज्याचे प्रमाण आपल्या शरीरात जर कमी झाले तर त्वचेची चमक निघून जाते. त्वचा तज्ज्ञांचे (Skin Experts) देखील असे मत आहे की डाग धब्बे मेकअपने लपविण्याऐवजी त्याची कारणे जाणून योग्य उपचार करणे गरजेचे आहे. निरोगी त्वचेसाठी जाणून घेऊयाच आवश्यक व्हिटॅमिन्सची माहिती….

व्हिटॅमिन ए (Vitamin A)-

BEAUTY-TIPS

व्हिटॅमिन ‘ए’ त्वचेला तरूण ठेवण्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण हे त्वचेच्या पेशींना पुन्हा निर्माण करते, ज्या लोकांना कोरडी त्वचा आणि मुरमांची समस्या. अशा लोकांनी व्हिटॅमिनयुक्त आहार घेणे जरूरी आहे. व्हिटॅमिन ‘ए’ त्वचेला मऊ आणि कोमल बनविण्यात मदत करते. आंबा, टरबूज, गाजर, पपई आणि मासे यामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण भरपूर असते.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स (Vitamin B Complex)-

Beauty-Tips

बी व्हिटॅमिन कॉम्प्लेक्स त्वचेला सुधारण्यास मदत करते. हे सेरामाइड आणि फॅटी ऍसिडच्या उत्पादनास प्रोत्साहित करते, जे त्वचेच्या समस्या सुधारण्यास उपयुक्त आहे. याशिवाय रंगद्रव्याची (पिग्मेंटेशन) समस्य़ा देखील कमी करते. ज्या लोकांना तेलकट त्वचेची समस्या आहे, त्यांच्यासाठी हा व्हिटॅमिन आवश्यक आहे कारण यामुळे सीबमचे उत्सर्जन कमी होते, ज्यामुळे त्वचेवरील तेल कमी प्रमाणात दिसून येते. धान्य, फळे, भाज्या आणि दही मध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असते.

व्हिटॅमिन सी (Vitamin C)-

Beauty-Tips

त्वचा तज्ज्ञांच्या मते व्हिटॅमिन ‘सी’ च्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर लाल रंगाचे दाणे येतात, त्यानंतर चेहरा निर्जीव दिसू लागतो आणि चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येतात. व्हिटॅमिन सी, आंबट फळे जसे की लिंबू, पालक, फुलकोबी, ब्रोकोली, बटाट्यामध्ये असते.

व्हिटॅमिन डी (Vitamin D)-

व्हिटॅमिन ‘डी’ ज्याला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हटले जाते, हे त्वचेसाठी आवश्यक आणि फायदेशीर आहे. याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर मुरूमे येतात. व्हिटॅमिन ‘डी’ अंडी, दूध, मशरूम, पनीर, लोणी, चीज आणि मासे यामध्ये भरपूर प्रमाणात असते.
Beauty tips: If you also want a beautiful face, then these vitamins are needed in the body


Beauty Tips : नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय फायदेशीर! –

Beauty Tips : चेहऱ्याची रंगत वाढविण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय!

Social Media