ब्राह्मणांमध्ये असे म्हणतात की शिधा आणावा देशस्थांनी
स्वयंपाक करावा कऱ्हाड्यांनी आणि वाढावे कोकणस्थांनी.
विनोदाचा भाग सोडा परंतु काही प्रमाणात हे खरे आहे.
( ब्राह्मणांमध्ये देवरूखे ही आणखी एक पोटजात आहे आणि देवरूखेही उत्तम स्वयंपाक करतात. )
अनेक कऱ्हाडे मंडळींची मुंबई,ठाणे पुणे, कोकण इत्यादी ठिकाणी एकतर हॉटेल्स तरी आहेत किंवा केटरिंगचा व्यवसाय तरी आहे.
पणशीकर,तांबे, पुरोहित,हॉटेल माधवाश्रम सरपोतदार या मंडळींची मुंबईतील हॉटेल्स सुप्रसिध्द आहेत.
ठाण्यातील पातकरांच्या खवय्यामधील पदार्थांची आणि डोंबिवलीच्या नाख्ये,नाखरे यांच्याकडे मिळणार्या पदार्थांची चव सर्वदूर पसरलेली आहे.
ब्राह्मणांकडे केल्या जाणाऱ्या शाकाहारी पदार्थांची चव, आणि त्यातही पक्वानांची चव इतरांना जमणार नाही.
उकडीचे मोदक, पुरणपोळी, गुळपोळी, ओल्या- सुक्या नारळाच्या करंज्या, कडबू, खांडवी, फणसाच्या गऱ्याच्या रसापासून केलेली सांदणं आणि हळदीच्या पानांमध्ये शिजवलेले पातोळे,
साटोऱ्या, नारळीभात, साखरभात, अनारसे इत्यादी ज्ञात अज्ञात पक्वानांची चव आणि सुबकता फक्त ब्राह्मणांकडेच आढळते.
कारण ब्राह्मणाच्या घरातल्या गृहिणींचा तसा प्रयत्न किंबहुना आग्रह असतो.
ब्राह्मणांकडे रोजचा गोडाचा शिरा आणि सत्यनारायणाच्या पुजेच्या वेळी केला जाणारा प्रसादरूपी शिरा यात तूप- साखरेचे प्रमाण ठरलेले असते.
पक्वानां व्यतिरिक्त इतरही अनेक पदार्थ आहेत ज्यांची चव फक्त आणि फक्त ब्राह्मणांकडेच चाखायला हवी.
गोडं वरण आणि आंबट वरण हे सुद्धा चविष्ट असू शकतं हे ब्राह्मणांकडेच जेवल्या नंतर कळत.
साध्या आमटी मधील विविधता ही ब्राह्मण गृहिणींची खासीयत आहे. तेला- तिखटाचा आणि इतर मसाल्यांचा ( काही घरांमध्ये मसाल्याला व्यंजन असेही म्हटले जाते. ) फार वापर न करताही पदार्थ उत्तम होतो हे ब्राह्मण गृहिणी जाणते.
कच्च्या फणसाची भाजी, डाळींबी, बटाट्याची उपवासाची भाजी ब्राह्मणांकडेच खावी. कडबोळी, थालीपीठ, भाजणीचे वडे, मसालेभात, टॉमेटोचे सार
( क्रीम ऑफ टॉमेटो किंवा तत्सम कोणत्या तरी बुळचट नावाचे मेणचट सूप नव्हे तर अस्सल झणझणीत सार ) ,
शिळया ताकाची उकड असे अनेक पदार्थ ब्राह्मण गृहिणीनीच करावेत. ब्राह्मण गृहिणीने शिळ्या भाताला फक्कड फोडणी दिली की तो अमृताहुन ही गोड लागतो
सर्वसाधारणपणे ब्राह्मणांना सात्विक आहार आवडतो आणि म्हणूनच बहुतांश ब्राह्मण नेमस्त स्वभावाचे असतात. (तथापि नेभळट मात्र नक्कीच नसतात.)
ब्राह्मण गृहिणी उगाचच ज्यात-त्यात कांदा लसणीचा मारा करून मूळ पदार्थाची चव बिघडवणार नाही .
चटणी, कोशिंबीर, भाजी, मीठ इत्यादी पदार्थांचे ताटामधील स्थान आणि ते वाढण्याचा क्रम आणि त्यामागचे शास्त्र ब्राह्मणा कडून शिकावे . अन्न हे पूर्ण ब्रह्म हे ब्राम्हण जाणतो . आणि ते मिळविण्या करीता राबणाऱ्या हातांचे कष्टही जाणतो . असो.
कोंड्याचा मांडा करण्याचे अंगभूत कौशल्य असलेल्या ब्राह्मण अन्नपूर्णांना शतश: वंदन
(वरील लेख ब्राम्हणाची स्तुती करण्यासाठी नव्हे तर
त्यांची अन्न संस्कृती कळावी म्हणून पोस्ट केलेला आहे.)
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारत अधोगतीच्या वाटेवर : अतुल लोंढे