सरकारने जनतेला दिली स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी!

नवी दिल्ली : सरकार पुढील आठवड्यापासून जनतेला स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. गुंतवणूकदार सॉवरन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) योजनेंतर्गत बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करु शकतात. ही योजना केवळ पाच दिवसांसाठी (२४ मे ते २८मे) खुली असेल. म्हणजेच सोमवारी याचा पहिला दिवस आहे. याच्या विक्रीवरील नफ्यावर प्राप्तिकर नियमांनुसार सूटसह इतरही बरेच फायदे मिळतील. सोन्याच्या बाँडसाठी 1 जून 2021 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

सोने गुंतवणूकदारांसाठी सरकारची योजना, पाच दिवसांसाठी असणार खुली….

The government’s plan for gold investors will be open for five days.

जपान च्या सॉफ्टबँक आणि भारताच्या भारती समुहाकडून एसबी एनर्जी इंडिया ताब्यात घेणार – 

सरकारद्वारे सोन्याच्या बाँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक वर्ष 2021-22 ही दिलेली दुसरी संधी आहे. पहिली संधी 17 ते 21 मे 2021 पर्यंत खुली होती. वित्त मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सॉवरेन गोल्ड बाँड मे पासून सप्टेंबर दरम्यान सहा आठवड्यांमध्ये जारी केले जाईल.

सोन्यात पुन्हा गुंतवणूक करण्याची सरकारची नवीन योजना!

The government’s new plan to reinvest in gold!

योजनेअंतर्गत तुम्ही ४,८४२ प्रती ग्रॅम सोने खरेदी करू शकता. म्हणजेच जर तुम्ही १० ग्रॅम सोने खरेदी केले तर त्याची किंमत ४८,४२० रूपये एवढी असेल आणि गोल्ड बाँडची खरेदी ऑनलाइन पद्धतीने केल्यास सरकार अशा गुंतवणूकदारांना ५० रूपये प्रती ग्रॅम अतिरिक्त सूट देते. यामध्ये अर्जदारांनी देय ‘डिजिटल मोड’च्या माध्यमातून करायचे आहे. ऑनलाइन सोने खरेदी केल्यास गुंतवणूकदाराला प्रती ग्रॅम सोने ४,७९२ रूपयाला पडेल. सोन्याच्या बाँडचा कालावधी आठ वर्षांचा असतो आणि यावर वर्षाला २.५ टक्के व्याज मिळते.

Next week, the government will again give an opportunity to invest in gold, the scheme will be open for five days


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भातील अफवांमुळे देशाच्या निर्यातीवर प्रभाव! –

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या निर्यातीवर परिणाम!

Social Media