संसदीय कामकाजात सरकारला रस नाही

मुंबई, दि. 29 : संसदीय कामकाजात सरकारला रसच नाही , त्यामुळेच तोकडी अधिवेशने घेत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आज झालेल्या कामकाज सल्लागार समिती च्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते, पहिला दिवस पुरवणी मागण्यांचा असणार. आमची मागणी होती की अधिवेशनाचा कालावधी वाढवावा. ३ दिवस ब्रेक घेऊन पुन्हा अधिवेशन घ्या अशी आमची मागणी आहे.पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा बिएसची मिटींग होणार आहे. त्यानंतर पुन्हा अधिवेशन कालावधी निश्चित करु असे सांगितलेय. असे फडणवीस म्हणाले.

२ वर्षात एकाही अतारांकित प्रश्न, लक्षवेधीला उत्तर दिलेले नाही याबाबत मी नाराजी व्यक्त केलीय. प्रलंबीत अतारांकित प्रश्नांना उत्तरे दिली जातील असे आश्वासन दिलेय.रोज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी होईल असे आश्वासन मिळालेय असं ते म्हणाले.

अधिवेशन नागपूरलाच झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे,जाणीवपूर्वक अधिवेशन नागपूरला घेतले जात नाही. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे कारण यामागे देण्यात आले आहे. किमान मार्चचे अधिवेशन हे नागपूरला घेण्यात यावे अशी आम्ही विनंती केलीय असे फडणवीस यांनी सांगितले.

संसदीय कामकाजात सरकारला रस नाही, अधिवेशन टाळण्याचे प्रयत्न ठाकरे सरकारकजून होतो हे स्पष्ट. असा आरोपही फडणवीसांनी केला.

Social Media