132 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांचा उपक्रम
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar)यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने काँग्रेस अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांच्या वतीने शहरातील इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलावर तब्बल ५५ हजार चौरस फुटाची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते अभिवादन करून ही भव्य रांगोळीची प्रतिकृती परभणी करांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली..डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 55 हजार चौरस फूट प्रतिमेसाठी तब्बल 120 क्विंटल रांगोळी लागली असुन 7 दिवस परभणीच्या 16 कलाकारांनी ही रांगोळी साकारली आहे.अतिशय सुदंर आणि भव्यदिव्य अशी प्रतिकृती पाहण्यासाठी परभणी कर मोठी गर्दी करत आहेत.



