नागपूर : केंद्र सरकारचा खादी ग्रामोद्योग विभाग ,लायन्स क्लब आणि ये जिंदगी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज नागपूरात धावत्या मेट्रोमध्ये द-खादी वॉक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.देशभरात खादी ला प्रोत्साहन देण्यासाठी या खादी वॉक चे आयोजन करण्यात आले.
नागपुरात अशाप्रकारचा आगळा वेगळा फॅशन वॉक होत असल्याने हा कार्यक्रम बघण्यासाठी नागरिकांनी थेट मेट्रो मध्ये गर्दी केली होती , यावेळी धावत्या मेट्रोमध्ये काही मॉडेल्सनी फॅशन वॉक करून खादीच्या विविध पोशाखांचे प्रदर्शन केले. मेट्रो द- खादी वॉक नावानं हा फॅशन वॉक आयोजीत करण्यात आला होता.नागपुरातील स्थानिक मॉडेल नी खादीच्या विविध पोषाखाचे सादरीकरण केले.
विविध वयोगटातील मॉडेल्सनी या फॅशन वॉकमध्ये सहभाग घेतला आणि खादी पोषाखांकडे लक्ष वेधून घेतले. खादीचे वस्त्रे परिधान करण्यासाठी युवा पीढीला प्रोत्साहित करणे हे ‘खादी वॉक -2021’ चे उद्दीष्ट सफल ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Tag — Khadi Apparels | Nagpur Metro | Fashion Walk