होळीच्या रंगात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकीय डावपेचांचे राजकारण रंगले!

मु्बई  : (किशोर आपटे) : राज्यात लोकसभा २०२४(Lok Sabha 2024)करिता सात टप्यात निवडणुका होत आहेत. होळीचा सण रंगात असतानाच यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात राजकीय डावपेचांचे राजकारण रंगात आले आहेत. यामध्ये महायुतीचा केंद्रबिंदू देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याकडे तर महाविकास आघाडीचा शरद पवार(Sharad Pawar) यांच्याकडे असल्याचे दिसून येत आहे.

दोनच दिवसांपूर्वी सातारा माढा बारामती(Baramati) अमरावती (Amravati)या जागांवर महायुतीला त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी जाहीरपणे विरोधी सूर लावत कुरबुरी सुरू केल्या होत्या. माढा येथे माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर(Ramraje Naik Nimbalkar) यांनी विद्यमान खासदार रणजीत निंबाळकर यांना विरोध दर्शवला होता. तर साता-यात माजी खासदार उदयनराजे यांच्या विरोधात भाजपमधून सूर व्यक्त करण्यात येवून नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्याचा विचार केला जात होता. बारामतीमध्ये विजयबापू शिवतारे यांनी पवारांच्या विरोधात शड्डू ठोकत प्रसंगी शिवसेना पक्ष सोडून देवून अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर बारामतीसाठी व्याकूळ भाजपच्या तंबूत घबराट पसरली. माढा मतदारसंघासाठी अडून बसलेल्या महादेव जानकरांना पर्यायी परभणीची जागा देण्याची कबूली देत पवारांची नुकतीच भेट घेवून आलेल्ता महादेव जानकरांना भाजपने रोखल्याचे सांगण्यात येत आहे. तर बीडच्या जागेवरून लढण्यासाठी शरद पवारांना भेटून तयारी करणा-या ज्योती मेटे यांना फडणवीस यांनी फोनवरून सांगावा धाडून विधानसभेत भाजपचे तिकीट देण्याचे आश्वासन देवून रोखल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अमरावतीत त्रांगड झाले आहे तेथे महायुतीची साथ सोडून बच्चू कडू बाहेर पडले असून त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडणारे आनंदराव अडसूळ यांना आपल्यासोबत घेत नवनीत राणा यांच्यासमोर लढत देण्याची तयारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

तिकडे महा आघाडीला सोडून जाण्याची तयारी करतानाच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी सात जागांवर कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे तर प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातून उमेदवारी जाहीर करत भाजप समोर आपल्या राजकीय आव्हानाची घोषणा केली आहे. पुन्हा सांगलीची जागा चंद्रहार पाटील यांना जाहीर करत शिवसेनेकडून कॉंग्रेसच्या विशाल पाटील यांच्यासाठी जागा न सोडण्याची चाल करण्यात आली आहे. तर कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराज यांना पाठिंबा देत आपण त्याग केल्याचे शिवसेना सांगत आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडीचे वातावरण आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या मनसेला तिसरा भिडू म्हणून सोबत घेण्याचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न आहे ,त्याला मुंबईतील उत्तर भारतीयानी पत्रके काढून कडाडून विरोध केला आहे. मुंबईत दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आलेल्या उत्तर भारतीय आणि चार लाखांच्या संख्येत असलेल्या बिहारी आणि झारखंड तसेच अन्य उत्तर भारतीय समाजाने मनसे सोबत भाजप केल्यास मतदानावर बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. गरीब उत्तर भारतीयांना रोजगारासाठी मुंबईत आल्यावर मारहाण करणा-या मनसेला सोबत घेतले तर मुंबईसह(Mumbai) उत्तर भारतामध्ये युपी बिहारमध्ये मतदानावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा संकेत मिळाल्याने आता भाजप मनसेचा छुपा पाठिंबा घेण्याची आणि त्याची भरपाई विधानसभा निवडणुकीत करण्याची शक्यता आहे.

उत्तर मुंबईत भाजपला निरुत्तर करण्याची ठाकरेंची खेळी? पियुष गोयलांसमोर तेजस्विनी घोसाळकराना उमेदवारीची शक्यता?

ईशान्य (उत्तर पूर्व) मुंबई लोकसभा मतदार संघ 

मंकी बात…

Social Media