रिचर्ड गिअर चुंबन प्रकरण : चौदा वर्षांनी शिल्पा शेट्टी दोषमुक्त

मुंबई : हॉलीवूड अभिनेत्याने सार्वजनिक कार्यक्रमात बॉलीवूड अभिनत्री शिल्पा शेट्टीला `किस’ केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यात शिल्पाला दंडाधिकारी दंडाधिकारी न्यायालयाने दोषमुक्त करत दिलासा दिला. न्यायालयाच्या निर्णायामुळे तब्बल १४ वर्षांनी शिल्पाला या प्रकरणातून मुक्तता मिळाली आहे.

२००७ साली एड्स जनजागृतीसाठी राजस्थानमधील एका जाहीर कार्यक्रामात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गिअऱ दोघे उपस्थित होते. क्रयक्रमादरम्यान, गिअरने शिल्पाला सर्वांसमोर किस केले होते. त्यानंतर वादाला तोंड फुटले होते. शिल्पाने वेळ मारून नेली होती. मात्र, आपल्यासाठी हे अनपेक्षित असल्याचे तिने नंतर स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर शिल्पाविरोधात अश्लिलता आणि असभ्यता पसरविल्याचा आऱोप करण्यात आले. राजस्थान न्यायालयाने शिल्पा आणि गिअऱविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते. त्यानंतर हे प्रकऱण राजस्थान न्यायालयाकडून मुंबई दंडाधिकारी न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. त्यावर नुकतीच न्यायाधीश केतकी चव्हाण यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

शिल्पावर कऱण्यात आलेल्या आरोपांचा तसेच तिने बचावासाठी केलेल्या युक्तिवादाचा अभ्यास केल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात गिअरकडून कऱण्यात आलेले कृत्य शिल्पाला सक्तीने सहन करावे लागले. तसेच पोलीस अहवाल तिच्याविरोधात असामान्य हेतू दर्शवत नाही. त्यामुळे ती कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरत नसून तिच्याविरोधातील आरोप निराधार असल्याचे निरिक्षण नोंदवत न्यायालयाने शिल्पाला आरोपातून तब्बल १४ वर्षांनी मुक्त केले.

Social Media