‘द स्पेल ऑफ पर्पल’ महिलांच्या धाडसाला सलाम करणारा चित्रपट : दिग्दर्शक प्राची बजानिया

पणजी : ‘द स्पेल ऑफ पर्पल’ (The Spell of Purple)या महिलांच्या धाडसाला सलाम करणारा, त्यांच्या धाडसी वृत्तीचे कौतूक करणारा चित्रपट आहे, त्याच वेळी पितृसत्ताक पद्धतींशी सतत लढा देतांना स्त्रियांना आलेला शारीरिक मानसिक शीण देखील या चित्रपटातून मांडला आहे. चेटकीण, करणी करणाऱ्या असल्याचा समज आपल्या देशातील हजारो महिलांबाबत आपल्या समाजात विनाकारण पसरवला जातो. कधी त्यांची संपत्ती हडप करण्यासाठी तर कधी त्यांना निष्कारण त्रास देण्याच्या दुष्ट हेतूने, अशा अफवा पेरल्या जातात. या चित्रपटात हाच विषय हाताळण्यात आला असून, गुजरातच्या एका छोट्या आदिवासी पाड्यातल्या महिला एकत्रित येऊन या पितृसत्ताक व्यवस्थेतील अन्यायाशी कसा लढा देतात, यांची ही कथा असल्याचे दिग्दर्शक प्राची बजानिया यांनी सांगितले. 52 व्या इफ्फी दरम्यान आज गोव्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत, छायाचित्रकार राजेश अमारा रंजन देखील यावेळी उपस्थित होते.

गुजरातमधल्या आंबी धुमालाच्या जंगलांतून भटकंती करतांना अचानक दिग्दर्शिकेच्या मनात हा विषय चमकून गेला. या चित्रपटाच्या शीर्षकामागच्या प्रेरणेविषयी बोलतांना त्या म्हणाल्या की, जांभळा रंग हा जादू आणि गूढ गोष्टींशी संबंधित आहे. प्राचीला या रंगाचा उपयोग, या चित्रपटाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तर करायचा होताच, त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे, अनेक संकटे झेलूनही स्त्रिया आजही तेजस्वी आहेत, बहरत आहेत, त्या संकटातून तावून-सुलाखून निघत आहेत, हे ही त्यांना सुचवायचे होते.

गुजराती भाषेमध्ये असलेल्या मूळ चित्रपटाचे नाव  ‘खिलशे तोह खरा’ (त्या नक्की बहरतील) असे होते.काहीही संकटे आली, त्यांच्याविरुद्ध कोणत्याही दुष्ट शक्ति उभ्या राहिल्यात तरीही, स्त्रिया पुन्हा बहरतील, असा विश्वास या शीर्षकातून व्यक्त करण्यात याला होता.

माहितीपटाचे छायादिग्दर्शक, राजेश अमारा राजन आपल्या अनुभवांविषयी बोलतांना म्हणाले की, या चित्रपटात, अनावृत्त सौंदर्याकडे पुरुषी नजरेतून बघतांनाच्या प्रसंगात, आपल्या कॅमेरा लेन्सच्या माध्यमातून ती नजर दाखवण्याचा प्रयत्न, हा त्यांच्यासाठी विलक्षण अनुभव होता.

यावेळी, चित्रपटाशी संबंधित इतर कलाकार, सृजना अडुसुमाली, (संकलक ) जिक्कू जोशी ( ध्वनिमुद्रक)  आणि शिखा बिष्त (प्रॉडक्शन डिझायनर) यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

52 व्या इफ्फीच्या भारतीय पॅनोरामा विभागात, नॉन फीचर फिल्म गटात हा चित्रपट दाखवण्यात आला असून, एफटीआयआय, पुणे अभ्यासक्रमात, प्रशिक्षणाचा भाग म्हणून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

चित्रपटाविषयी माहिती (Information about the film:):

ईनास, गुजरातमधल्या आदिवासी भागातील  एका छोट्या शेताची एकमेव मालकीण असते, तिच्या त्या शेतावर आजूबाजूच्या लोकांचा डोळा असतो, त्यामुळे तिचा काटा काढण्यासाठी ते तिला ‘चेटकीण’ ठरवतात. या घटनेने घाबरलेली एकटी ईनास, आपल्याला पाठबळ मिळावे, म्हणून इतर महिलांकडे आशेने बघते.नुकतीच आई झालेली पण एकटेपणाचा सामना करत असलेली एक महिला आणि एक तरुण नवविवाहिता, यांच्याशी ईनास बोलते. मोहा वृक्षांच्या जंगलात सुरु असलेले त्यांचे गुप्त संभाषण, कधी कधी, प्राचीन लोकगीतांच्या माध्यामातून त्यांनी साधलेला संवाद.. या महिलांच्या अशा धाडसामागे सतत असलेली प्रचंड भीती, या चित्रपटातून अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने दाखवण्यात आली आहे.

 

दिग्दर्शिका : प्राची बजानिया(prachi bajania)

 

निर्माते : : FTII/भूपेंद्र कंथोला(Bhupendra Kanthola)

 

पटकथा  : प्राची बजानिया(prachi bajania)

 

छायाचित्र दिग्दर्शक: राजेश अमारा राजन(Rajesh Amara Rajan)

 

संकलक :  सृजना

 

कलाकार  : स्वाती दास(Swati Das) , श्रद्धा कौल(Shraddha Kaul) , विदिशा पुरोहित(Vidisha Purohit)

Social Media