जगाला आता ‘बी.१.६१७’च्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका; डब्ल्यूएचओचा अभ्यास सुरू…..

संयुक्त राष्ट्र : जागतिक आरोग्य संस्थेने (World Health Organization, WHO) सांगितले आहे की, कोरोनाच्या ‘बी.१.६१७’ स्ट्रेनचा ‘बी.१.६१७.२’ व्हेरिएंट आता चिंतेचा विषय (व्हेरिएंट ऑफ कन्सर्न-व्हिओआय) बनला आहे. याला ‘डेल्टा व्हेरिएंट’ असे नाव देण्यात आले आहे. जगभरात सतत वेगाने डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणे वाढत असल्याचे समोर येत आहे, ज्यामुळे डब्ल्यूएचओ चिंतीत आहे आणि यासंबंधी सतत अभ्यास करीत आहे. डब्ल्यूएचओ ने सांगितले आहे की, दोन इतर कोरोनाचे प्रकार बी.१.६१७.१ आणि बी.१.६१७.३ चा संसर्ग दर सध्या खूप कमी झाला आहे. हा प्रकार सर्वात प्रथम भारतात आढळला होता. डब्ल्यूएचओ च्या मते १ जूनपर्यंत कोरोनाचा डेल्टा हा प्रकार जगातील ६२ देशांमध्ये पसरला आहे.

Delta-variant

‘डेल्टा’ व्हेरिएंटची प्रकरणे वाढत असल्याने डब्ल्यूएचओ चिंतीत!

WHO worried as ‘Delta’ variant cases are on the rise!

याशिवाय ‘बी.१.६१७.१’ म्हणजेच कापा व्हेरिएंट चा जागतिक पातळीवर संसर्ग दर कमी झाल्यानंतर देखील काही ठिकाणी अजूनही अंशिक वाढ दिसून आली आहे. ज्यामुळे त्याचेही परिक्षण केले जात आहे. याचे व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्टनुसार (व्हिओआय) वर्गीकरण करण्यात आले आहे. तर, बी.१.६१७.३ या प्रकाराला व्हीओआय ने आणि व्हीओसी ने मान्यता दिली नाही, कारण याद्वारे संसर्गाची खूप कमी प्रकरणे आढळली आहेत.

सोमवारी डब्ल्यूएचओ ने कोरोनाच्या विविध प्रकारांना ग्रीक अल्फाबेटनुसार अल्फा, बीटा, गॅमा इत्यादी नावे दिली जेणेकरून त्यांना लक्षात ठेवणे आणि बोलणे सोपे होईल. सोबतच नाव देताना या गोष्टीची देखील काळजी घेण्यात आली की, जेथे हा व्हेरिएंट प्रथम आढळला आहे, त्या ठिकाणाशी याचे नाव जोडले जाणार नाही.
Now the world is threatened by only the delta variant of the B.1.617 strain, WHO is studying.


‘सिनोवॅक’ आपत्कालीन वापराच्या यादीत सामावेश करण्यासाठी मान्यता –

कोरोनावर मात करणाऱ्यांना लसीनंतर बूस्टर डोसची आवश्यकता नाही….

Social Media